HW News Marathi
Covid-19

हो, ऑक्सिजनअभावी देशात अनेकांचा मृत्यू, गडकरींचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

नवी दिल्ली | देशात गेल्या वर्षापासून कोरोनाचं संकट घोंघावत आहे. अशात कोरोना बाबतीत केंद्राकडून एक मोठं आणि धक्कादायक विधान करण्यात आलं आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिलेल्या एका लेखी उत्तरादखलच्या वक्तव्यामुळे केंद्र सरकावर टीकेची झोड उठत आहे. ‘ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे देशात एकही मृत्यू झाला नाही’ असे लिखीत उत्तर पवार यांनी संसदेत केलं आहे. यावरुन विरोधी पक्षांसह सोशल मिडीयावरही सरकारवर टीका केली आहे. दरम्यान, या उत्तरानंतर केंद्रीयमंत्री नितीन गडकरींचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे.

 

शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही केंद्र सरकारच्या उत्तरावर नाराजी व्यक्त करत सरकारवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तर, दुसरीकडे नेटीझन्सनेही सरकारला धारेवर धरले आहे. त्यातच, भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचा जुना व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये, देशात ऑक्सीजनअभावी अनेक रुग्णांचा मृत्यू झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, ऑक्सिजनमुळे एकही मृत्यू न झाल्याचा सरकारचा दावा खोडून काढणारा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये नितीन गडकरी असे म्हणतात की, ‘”कोरोनाच्या या काळात आपल्या देशातील अनेक लोकांना ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे आपला जीव गमवावा लागला.”

केंद्राने काय सांगितलं आहे?

पहिल्या लाटेत मेडिकल ऑक्सिजनची मागणी ३,०९५ मेट्रिक टन एवढी वाढली. त्यानंतर दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची मागणी ९,००० मेट्रिक टन पर्यंत पोहोचली. त्यामुळे केंद्राला राज्यांमध्ये समान वितरणाची सोय करावी लागली असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी राज्यसभेत सांगितले आहे.

देशात कोरोनाकाळात ४० लाख अतिरिक्त मृत्यू?

राज्यसभेत निवेदन देताना केंद्राने सांगितलं की, आरोग्य हा राज्य सरकारचा विषय आहे. तपशीलवार मार्गदर्शक सूचनांनुसार कोरोना रुग्णसंख्या आणि मृत्यूची आकडेवारी नियमितपणे सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांद्वारे दिली जाते. दुसर्‍या लाटेत ऑक्सिजनच्या तीव्र कमतरतेमुळे रस्त्यावर आणि रुग्णालयात मोठ्या प्रमाणात कोविड -१९ रूग्णांचा मृत्यू झाला का या प्रश्नाच्या उत्तरावर आरोग्य राज्यमंत्री भारती प्रवीण पवार यांनी उत्तर दिले. “आरोग्य हा राज्याचा विषय आहे आणि राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश नियमितपणे बाधितांची आकडेवारी आणि मृत्यूची संख्या केंद्राकडे नोंदवतात.”

लेखी उत्तरात काय लिहिले आहे?

“केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मृत्यूची नोंद करण्यासाठी सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केली आहेत. त्यानुसार सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश नियमितपणे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला माहिती देतात. त्यामुळे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांपासून स्वतंत्रपणे ऑक्सिजन नसल्यामुळे मृत्यूची कोणतीही आकडेवारी आलेली नाही,” असं लेखी उत्तरात सांगण्यात आलं होतं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अमोल मिटकरींना आमदार करणार, अजित पवारांनी दिलेला शब्द पाळला

News Desk

मुंबई महानगर क्षेत्रातील कोरोना परिस्थितीचा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंनी रुग्णालयातून घेतला आढावा

Aprna

रशियाच्या ‘स्पुटनिक-व्ही’ लसीबाबत राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती, राज्य सरकारचं ‘प्लॅनिंग’ जोरदार

News Desk