HW News Marathi
महाराष्ट्र

अनिल देशमुखांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात उद्या निकाल

मुंबई | माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध मनी लॉड्रिंग प्रकरणात CBI ने गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी अनिल देशमुखांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर आता सर्वोच्च न्यायालयात उद्या (२२ जुलै) निकाल येण्याची शक्यता आहे. गेल्या दीड महिन्यापासून देशमुखांच्या याचिकेवर सुनावणी पार पडली. सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. त्याबाबत आता उद्याच निकाल येण्याची शक्यता आहे. मनी लॉर्डिंग प्रकरणात अनिल देशमुखांविरोधात CBI कडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका देशमुखांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. तसंच या गुन्ह्यातील दोन कलम रद्द करण्यासाठी राज्य सरकारकडूनही याचिका दाखल करण्यात आलेली आहे.

३०० नाही, ४ कोटीची संपत्ती जप्त, अनिल देशमुखांनी दिलं स्पष्टीकरण

मनी लॉर्डिंग प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबईतील संपत्ती ईडीने जप्त केली आहे. मुंबईतील घर आणि उरण परिसरातील जमीन अशी मिळून ४ कोटी २० लाख रुपये किमतीची मालमत्ता जप्त केल्याचं सुरुवातीला सांगण्यात आलं. मात्र, या संपत्तीची बाजारभावाप्रमाणे आजची किंमत ही ३०० कोटीच्या वर असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे देशमुख यांची ४ नाही तर तब्बल ३०० कोटी रुपयाची संपत्ती जप्त केल्याचं बोललं जात आहे. याबाबत स्वत: अनिल देशमुख यांनी स्पष्टीकरण दिलं होतं. आपली ३०० कोटी नाही तर फक्त ४ कोटीची संपत्ती ईडीने तात्तपुरती जप्त केल्याचं देशमुख म्हणाले होते.

‘सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर ईडीसमोर जाणार’

ईडीने माझ्या परिवाराची अंदाजे ४ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. मुलगा सलील देशमुख याने २००६ मध्ये २ कोटी ६७ लाख रुपयाची जमीन खरेदी केली होती. ती जमीन ईडीने जप्त केली आहे. पण काही वर्तमानपत्रात २ कोटी ६७ लाख रुपयांची जमीन ३०० कोटीची दाखवून गैरसमज पसरवले जात आहे, असं देशमुख यांनी म्हटलं होतं. तर मला ईडीचे समन्स आले होते. त्याविरोधात मी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्याचा जो निकाल येईल त्यानंतर मी स्वत: ईडीसमोर माझा जबाब नोंदवायला जाणार आहे, असं देशमुख यांनी म्हटलं होतं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राज्यातील जनतेला दिल्या ‘मराठी भाषा गौरव दिना’च्या शुभेच्छा

News Desk

“आम्ही समोरून कोथळा काढतो!”, संजय राऊतांचं प्रत्युत्तर

News Desk

भाजपाचा महामेळावा सुरु होण्याआधीच भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस

News Desk