HW News Marathi
महाराष्ट्र

‘बा विठ्ठला, मुख्यमंत्री स्वतः गाडी चालवत मंत्रालयात सुद्धा जाऊ दे’ मनसेची विठ्ठलचरणी प्रार्थना!

मुंबई। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला स्वतः गाडी चालवत विठ्ठलाच्या भेटीला गेले. यावर मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी चांगलाच निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री जसे स्वत: गाडी चालवत विठ्ठलाच्या भेटीला आले, तसेच ते स्वत: गाडी चालवत मंत्रालयात सुद्धा जाऊदेत असा टोला संदीप देशपांडे यांनी लगावला. संदीप देशपांडे यांनी ट्विट करत हा टोला लगावला आहे.

संदीप देशपांडे यांचं ट्विट

संदीप देशपांडे म्हणतात, ” हे बा विठ्ठला जसे आमचे मुख्यमंत्री स्वतः गाडी चालवत तुझ्या भेटीला आले तसेच स्वतः गाडी चालवत मंत्रालयात सुद्धा जाऊदे. आणि जशी तुझी भेट घेतली तशी एकदा जनतेशी पण भेट घेउदे हीच तुझ्या चरणी प्रार्थना. पांडुरंग… पांडुरंग..”

 

मुख्यमंत्री स्वतः पंढरपूरपर्यंत ड्रायव्हिंग करत पोहचले

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणीच्या शासकीय पूजेसाठी काल (१९जुलै) दुपारी पंढरपूरला रवाना झाले. काल रात्री ९ च्या सुमारास ते पंढरपुरात दाखल झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबासह मुंबईतील मातोश्री निवासस्थानावरुन दुपारी अडीचच्या सुमारास पंढरपूरकडे रवाना झाले होते. यावेळी ते स्वत: ड्रायव्हिंग करत होते. या प्रवासाचा व्हिडीओ देखील चर्चेचा विषय ठरला होता.

आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते श्री क्षेत्र पंढरपुरात श्री विठ्ठल-रखुमाईची शासकीय महापूजा पार पडली. तुडुंब भरलेलं, आनंदी पंढरपूर पुन्हा पाहायचंय… ते वातावरण लवकर निर्माण होवो, अशी प्रार्थना मुख्यमंत्र्यांनी यावेळी विठुराया चरणी केली आहे.

शासकीय महापूजा

पंढरपूरमधील विठ्ठल – रुक्मिणी मंदिरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते शासकीय महापूजा भक्तीमय वातावरणात पार पडली . पहाटे सव्वा दोन वाजल्यापासून या महापुजेला सुरुवात करतेवेळी मुख्यमंत्र्यांसोबत एका वारकऱ्याला या महापूजेचा मान मिळतो. मात्र यंदा वारीच नसल्याने हा मान विठ्ठल – रुक्मिणी मंदिरातील विणेकरी मूळचे वर्धा येथील केशव शिवदास कोलते यांना मिळाला होता . मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , पत्नी रश्मी ठाकरे यांच्या समवेत वर्धा येथील केशव शिवदास कोलते व त्यांची पत्नी इंदूबाई केशव कोलते यांना यंदा विठ्ठलाच्या शासकीय महापूजेचा मान मिळाला .

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जयश्री पाटलांचा ईडीने नोंदवला ४ तास जबाब ! अनिल देशमुखांविरोधात पुरावे दिले ?

News Desk

‘ठाकरे सरकारचा अहंकार दुर्योधनाच्या अहंकारासारखाच’ विरोधी पक्षाची टीका

Ruchita Chowdhary

आंदोलनाचा प्रतिसाद म्हणजे जनतेच्या मनात सरकारबद्दलचा असंतोष

swarit