HW News Marathi
महाराष्ट्र

अमित राज ठाकरे तातडीने नाशकात, राज ठाकरे मोठी जबाबदारी देणार?

मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला काल मोठा धक्का बसला आहे. अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन आदित्य शिरोडकर यांनी काल शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे मनसेत मोठी उलथापलथ होण्याचे संकेत मिळत आहेत. मनसेच्या विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदाची धुरा थेट अमित ठाकरेंकडेच जाणार असून त्याबाबतची आजच घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अमित ठाकरे यांच्याकडे अध्यक्षपद?

आदित्य शिरोडकर हे आधी मनसेचे विधार्थी सेनेचे अध्यक्ष होते, पण काल(१६ जुलै) त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश केला आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यामुळे अमित ठाकरे आणि मनसेचे नेते संदीप देशपांडे तातडीने नाशिकला दाखल झाले आहेत. नाशिकमध्ये राज ठाकरे यांची भेट घेऊन हे दोन्ही नेते विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदाबाबत चर्चा करणार आहेत. कदाचित राज ठाकरे दुपारी पत्रकार परिषद घेऊन अमित ठाकरे यांची विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येत असल्याचं जाहीर करण्याची शक्यता आहे.

निवडणुकांसाठी शिवसेना सज्ज

मुंबई महापालिकेसाठी पुढील वर्षी निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांमध्ये शिवसेना पक्ष नेहमीच श्रेष्ठ राहिला आहे. शिवसेनेने आता निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यातच आदित्य शिरोडकर यांनी मनसेला जय महाराष्ट्र केल्याने मनसेला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे शिरोडकर यांनी पक्ष सोडल्याने विद्यार्थी संघटना खिळखिळी होऊ नये म्हणून अमित ठाकरे यांच्याकडे विद्यार्थी संघटनेची धुरा देण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. अमित यांच्याकडे विद्यार्थी संघटनेची धुरा दिल्यास विद्यार्थी संघटना डॅमेज होणार नाही, उलट तरुणाईचा मनसेकडे ओघ वाढेल. तसेच विद्यार्थी संघटनेचा पालिका निवडणुकीच्या मोर्चेबांधणीत उपयोगही करता येईल. त्यामुळे अमित यांच्याकडे विद्यार्थी संघटनेची सूत्रे दिली जाऊ शकतात, असं सांगितलं जात आहे.

आमचा मुख्यमंत्री जगात भारी

शिवसेना आणि मनसे यांच्यातला वाद काही नवीन नाही. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे हे नेहमीच सरकारवर टीका करत असतात. शिरोडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी थेट मुख्यमंत्र्यांवरच टीका केली आहे. मंत्रालयात जायला वेळ नाही. लॉकडाऊनमुळे लोक आत्महत्या करतायत तिथे बघायला वेळ नाही. बाकी घरी बोलवून धागे बांधायला वेळ आहे. आणि करोना काळात राजकारण करू नका म्हणून अक्कल शिकवायला सर्वात पुढे. आमचा मुख्यमंत्री जगात भारी, अशी टीका देशपांडे यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अॅपे रिक्षातून पडून विद्यार्थ्यीनीचा मृत्यू

News Desk

येत्या तीन दिवसात राज्यात दाखल होणार मान्सून

Atul Chavan

राष्ट्रपती निवडणूक मतदानावेळी सत्ताधारी-विरोधकांची एकमेकांवर नजर

News Desk