HW News Marathi
महाराष्ट्र

आता थेट केंद्रीय आरोग्यमंत्रीच म्हणाल्या, ‘उद्धवजी, मंदिरं उघडा!’

मुंबई। देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. तर महाराष्ट्र राज्यात तिसऱ्या लाटेचा इशारा तज्ज्ञांकडून वारंवार दिला जातोय. अशाही परिस्थितीत राज्यातील मंदिरं उघडण्याची मागणी भाजप करत आहे. आतापर्यंत राज्यातील भाजप नेते मंदिरं उघडण्याची मागणी करत होते. आता थेट मोदींच्या मंत्रिमंडळातील केंद्रीय राज्य आरोग्यमंत्री डॉ. भारती पवार यांनीच मुख्यंमंत्र्यांकडे मंदिरं उघडण्याची मागणी केली आहे.

लसीकरणात 75 कोटींचा आकडा पार केलाय

महाराष्ट्रात कोविड नियमांचे पालन करून भक्तांसाठी मंदिर उघडायला हवीत. नागरिक नियम पाळत आहे. उद्धवजींनी आता मंदिरं उघडायला हवीत, असं मतं केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी व्यक्त केली. तसंच ही मागणी करताना त्यांनी वाढलेल्या लसीकरणाचा टक्का देखील अधोरेकित केला.देशात लसीकरणात 75 कोटींचा आकडा पार केलाय. हे सरकारचे यश आहे. पुढच्या काळात हा आकडा आणखीन वाढेल. देशभरातही मोठ्या प्रमाणात लसीकरण होत आहे. त्याचबद्दल डब्लू. एच. ओ. ने कौतुक करणं हा भारताचा गौरव आहे, असंही भारती पवार म्हणाल्या.

तिसरी लाट येऊ नये म्हणून शासनस्तरावर प्रयत्न

देशात वारंवार तिसऱ्या लाटेचा इशारा तज्ज्ञांकडून दिला जात आहे. याचविषयावर बोलताना डॉ. भारती पवार म्हणाल्या, “तिसरी लाट येऊ नये म्हणून शासनस्तरावर प्रयत्न होतोय. मास्क वापरायला हवा. नागरिकांनी नियम पाळायला हवेत, नागरिकांनी कोरोनाच्या बाबतीत सतर्क राहायला हवे. महाराष्ट्रात कोविड नियमांचे पालन करून मंदिर दर्शनासाठी उघडायला हवी, असं त्या म्हणाल्या.

भाजपतर्फे राज्यभरात घंटानाद आंदोलन

भाविकांना दर्शनासाठी मंदिरं खुली करावीत या मागणीसाठी 29 ऑगस्टला भाजपतर्फे राज्यभरात घंटा नाद आंदोलन करण्यात आलं. पुणे, अहमदनगर, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, बीडमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी मंदिर उघडण्याची मागणी करत घंटानाद आंदोलन केलं. आंदोलनात ‘दार उघड, उद्धवा दार उघड’ची जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. राज्यात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे धार्मिक स्थळे उघडण्याची परवानगी नाही. मात्र, भाजपने मंदिरं सुरु करण्याची मागणी लावून धरली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“चौकातलं भाषण आणि सभागृहातलं भाषण यातलं अंतर हे मुख्यमंत्र्यांना अद्यापही लक्षात आलेलं नाही”- देवेंद्र फडणवीस

News Desk

हसन मुश्रीफ सोडणार अहमदनगरचं पालकमंत्री पद?

News Desk

‘शासनाच्या सर्व विभागांनी रिक्त पदांचा प्रस्ताव १५ ऑगस्टपर्यंत MPSC’कडे पाठवा, अजित पवारांचे आदेश

News Desk