HW News Marathi
महाराष्ट्र

‘पाच दिवसांच्या बाप्पांचं आज विसर्जन’! ठाणे प्रशासन सज्ज

ठाणे | राज्यात आज(१४ सप्टेंबर) ठिकठिकाणी पाच दिवसांच्या गणपतींचं विसर्जन आहे. माहेरवाशीण गौरीची पूजाअर्चा केल्या नंतर आज त्यांचे देखील विसर्जन होणार आहे. त्यासाठी ठाणे महानगरपालिकेने 7 घाट, 13 कृत्रिम तलाव आणि 20 स्वीकृत केंद्र सज्ज ठेवले आहेत. दुपारनंतर विसर्जन ठिकाणी भक्तगण येणार असल्यामुळे या ठिकाणी बॅरेकेटिंग करत जागोजागी सूचना फलक लावले आहेत. प्रत्येक ठिकाणी स्वच्छता देखील राखली जात आहे.

अँटीजेन टेस्ट शिवाय परवानगी नाही

विसर्जन ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून भाविकांना घरातूनच गौरी, गणपतीची आरती करून विसर्जनस्थळी यावे, अशा सूचना पालिकेने दिल्या आहेत. तसेच विसर्जनस्थळी केवळ मोजक्याच लोकांना प्रवेश दिला जाणार आहे. शिवाय ज्यांना प्रवेश दिला जाणार त्यांची अँटिजेन टेस्ट केली जाणार आहे. त्यासाठी नागरिकांनी तपासणी करण्यास सहकार्य करावे, असे आव्हान महापौर नरेश म्हस्के आणि पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी केले आहे. ठाण्यातील मासुंदा तलावाच्या ठिकाणी कृत्रिम तलाव तयार करण्यात आला असून या ठिकाणी गौरी विसर्जनासाठीची हळूहळू भाविक येताना दिसत आहेत.

कोणत्या तलावात किती गणेश मुर्तींचे विसर्जन

यावर्षी महापलिकेने निर्माण केलेल्या या पर्यायी व्यवस्थेचा लाभ उठवत शहरामधील हजारो भाविकांनी आपल्या दीड दिवसांच्या गणपतीचे कृत्रीम तलावामध्ये वाजत गाजत विधिवत विसर्जन केले. यावर्षी खारेगाव तलाव येथे 552 घरगुती गणेशमूर्ती, मासुंदा तलाव तसेच अहिल्यादेवी तलाव येथे मिळून 1025 घरगुती गणेशमूर्ती, आंबेघोसाळे तलाव येथे 400 घरगुती गणेशमूर्ती, रेवाळे तलाव येथे 612 घरगुती गणेशमूर्ती आणि 5 सार्वजनिक गणेशमूर्ती, मुल्लाबाग येथे 466 घरगुती गणेशमूर्ती, खिडकाळी तलाव येथे 86 घरगुती गणेशमूर्ती, शंकर मंदिर तलाव येथे 62 घरगुती गणेशमूर्ती, उपवन तलाव येथे 1338 घरगुती गणेशमूर्ती, तसेच गणेशमूर्तींचे स्वीकृती केंद्रावरील मूर्तींचे महापालिकेच्या पर्यावरणपूरक व्यवस्थेअंतर्गत विधीवत विसर्जन करण्यात आलेले आहे.

तर मीठबंदर घाट येथे 461 घरगुती गणेशमूर्ती, रायलादेवी तलाव घाट-1 येथे 340 घरगुती तर 6 सार्वजनिक गणेशमूर्तींचे, रायलादेवी तलाव घाट-2 येथे 917 घरगुती गणेशमूर्ती, कोलशेत घाट-1 व 2 येथे 679 घरगुती गणेशमूर्ती आणि 4 सार्वजनिक गणेशमूर्ती, दिवा विसर्जन घाट येथे 514 घरगुती गणेशमूर्ती, पारसिक घाट येथे 405 घरगुती गणेशमूर्ती, 5 सार्वजनिक गणेशमूर्ती, गायमुख घाट 1 व 2 मिळून 435 गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आलेले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोठी बातमी! १०वी-१२वीच्या परीक्षा पुढे ढकलल्या, वर्षा गायकवाडांची घोषणा 

News Desk

“राणेंना संपवणं अशक्य, विरोधकांना अनेक जन्म घ्यावे लागतील”

Ruchita Chowdhary

दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर दुर्घटनाग्रस्त गोविंदांना आर्थिक सहाय्य

Aprna