HW News Marathi
महाराष्ट्र

खडसेंचे जावई गिरीश चौधरी १९ जुलैपर्यंत ईडीच्या कोठडीत

मुंबई | राष्ट्रवादी पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. ईडीने आता त्यांची कोठडी १९ जुलै पर्यंत वाढवली आहे. पैश्यांच्या घोटाळ्याप्रकारकणी त्यांच्या जावयाला ७ जुलैला चौकशी साठी बोलावलं होतं आणि तेव्हाच त्यांना अटक केलं गेलं. पुण्याजवळच्या भोसरी या ठिकाणी जमीन व्यवहार प्रकरणात त्यांचं नाव समोर आलं.

काय आहे नेमकं प्रकरण?

भोसरी येथील एमआयडीसी भूखंड घोटाळाप्रकरणी माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी, जावई गिरीश चौधरी, यांच्यासह इतरांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला होता. खडसे यांच्यावर पदाचा दुरुपयोग करून हा जमीन व्यवहार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. तर, ही जमीन शारदा खडसे यांच्या नावावर असून आर्थिक व्यवहाराबद्दलही त्यांच्यावर आरोप आहेत.

एकनाथ खडसे यांना ईडी कडून समन्स

पुण्यातील भोसरी जमीन घोटाळ्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे अडचणीत सापडले आहेत. एकनाथ खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीने अटक केली आहे. त्यानंतर एकनाथ खडसे यांनादेखील समन्स बजावण्यात आलेलं असून, त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आली आहे. ईडीसमोर हजर राहण्यापूर्वी आज (८ जुलै) खडसे पत्रकार परिषद घेणार होते. मात्र, त्यापूर्वी त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे ही पत्रकार परिषद रद्द केल्याची माहिती देण्यात आली होती. यानंतर खडसे चौकशीला हजर राहणार का असा प्रश्न उपस्थित केला जात असताना मुंबईत ईडीच्या कार्यालयात एकनाथ खडसे चौकशीसाठी पोहोचले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कुस्तीपटू रविकुमार दहियाने जिंकलेल्या ऑलिंपिक रौप्य पदकालाही सुवर्ण झळाळी- अजित पवार

News Desk

“आता कळले ठाकरे सरकारमधील काही मंत्री…”, नितेश राणेंचा ठाकरे सरकारवर निशाणा

News Desk

मोदी सरकराच्या इमेज बिल्डिंगवर अनुपम खेर यांचा थेट प्रहार! प्रतिमेपेक्षा लोकांचा जीव वाचवा…

News Desk