HW News Marathi
Covid-19

दहावीच्या निकालाची तारीख जाहीर, उद्या दुपारी लागणार निकाल!

मुंबई | राज्यातील दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या (१६ जुलै) जाहीर होणार आहे. बोर्डाच्या वेबसाईटवर दुपारी 1 वाजता हा निकाल पाहता येईल. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबतची माहिती दिली. राज्य सरकारनं महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्यावतीनं घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षा यंदा कोरोना विषाणू संसर्गाची दुसरी लाट असल्यानं रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला होता.

दहावीचा निकाल कुठे पाहता येणार?

www.mahresult.nic.in

www.sscresult.mkcl.org

www.maharashtraeduction.com

या वेबसाईटस वर आणि मोबाईल फोनवरुन एसएमएसद्वारे देखील निकाल पाहता येणार आहे.

निकाल कसा पाहाल ?

– निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी वर दिलेल्या कोणत्याही वेबसाईटवर जा.

– त्यानंतर तुम्हाला SSC BOARD RESULT नावाचा ऑप्शन दिसेल.

– त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा सीट नंबर स्पेसशिवाय टाईप करावा लागेल.

– त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षर टाकावी लागतील. म्हणजेच समजा तुमचा नंबर M123456 असा असेल आणि तुमच्या आईचे नाव सुवर्णा असेल, तर तुमच्या पहिल्या रकान्यात M123456 हा सीट नंबर येईल आणि दुसऱ्या रकान्यात आईच्या नावाची पहिली तीन अक्षरे म्हणजेच SUV असे लिहावे लागेल.

– यानंतर लगेचच तुम्हाला निकाल स्क्रीनवर दिसेल.

-निकाल पाहिल्यानंतर तुम्हाला तो डाऊनलोडही करता येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना निकालाची प्रिंटआऊटही काढता येणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनावरील कोवाक्सिन लस भारतात १५ ऑगस्टपर्यंत लॉन्च होण्याची शक्यता

News Desk

१०० टक्के लसीकरण केल्याबद्दल नारिवली ग्रामपंचायतीचा केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते गौरव

Aprna

लसीकरण फसल्यामुळे मोदींच्या अपयशावर पांघरून घालण्याचा केविलवाणा प्रयत्न, नाना पटोलेंचा घणाघात

News Desk