HW News Marathi
महाराष्ट्र

‘मोदी सरकारकडून योगी सरकारचं कौतुक,’ कोरोना रोखण्यात उत्तर प्रदेशची कामगिरी उल्लेखनीय!

नवी दिल्ली। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका देशाला मोठ्या प्रमाणावर बसला होता, दुसरी लाट मात्र अजूनही कमी होण्याचं काही नाव घेत नाहीये अस केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. अशातच महाराष्ट्रातही कठोर निर्बंध कायम असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. एवढेच नव्हे, तर राज्यांना निर्बंध लावण्याबाबतचे निर्देश केंद्राकडून देण्यात आले आहे. यातच आता कोरोना नियंत्रणाबाबत केंद्रातील मोदी सरकारकडून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांच कौतुक करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदींनी याबाबत योगी आदित्यनाथ यांची पाठ थोपटली असल्याची माहिती समजतेय.

दुसऱ्या लाटेतील नव्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. तरीही निर्बंध कमी करण्याला राज्य किंवा केंद्र तयार नाही. अस असतांना तिसऱ्या लाटेचा इशाराही देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून अनेक उपाययोजना सरकारकडून केल्या जात आहेत. मात्र, यातच आता कोरोना नियंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशच्या योगी सरकारचं कौतुक केले आहे

नरेंद्र मोदी यांनी कोरोना नियंत्रणाबद्दल योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केले आहे. कोरोनाशी लढा देण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारचे प्रयत्न उल्लेखनीय आहेत. काशीतील माझ्या सहकाऱ्यांचे, शासन- प्रशासनाचे, कोरोना योद्ध्यांच्या संपूर्ण गटाचे विशेष आभार मानतो. तुम्ही ज्याप्रमाणे दिवस-रात्र झटून व्यवस्था निर्माण केली आहे, ही खूप मोठी सेवा आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक संकटे आली. कोरोना विषाणूच्या बदलणाऱ्या आणि अधिक घातक रुपाने संपूर्ण ताकदीने आपल्यावर हल्ला चढवला. मात्र, काशीसह संपूर्ण उत्तर प्रदेशने या संकटाशी खंबीरपणे लढा दिला, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेनेच्या आमदारांशी बातचीत केल्यानंतर मुख्यमंत्री राष्ट्रवादीच्या आमदारांना भेटणार!

News Desk

Ruchita Chowdhary

मुख्यमंत्री पदासाठी शिवसेना आक्रमक, भाजपवर दबाव

News Desk