HW News Marathi
देश / विदेश

शरद पवारच पंतप्रधानपदाचे योग्य उमेदवार! ,संजय राऊतांचं मोठं विधान

नवी दिल्ली | महाविकासआघाडी आणि विरोधी पक्ष हे नेहमीच एकमेकांवर टीका करताना दिसतात. शिवसेना नेते संजय राऊत हे त्यांच्या बिनधास्त आणि वादगॅस्त्र वक्त्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. असंच एक विधान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीं विरुद्ध केलं आहे. आता सगळ्या पक्षांची मोट बांधायची असेल आणि त्याचं नेतृत्व जर कुणी करायचं असेल तर तो चेहरा शरद पवार यांचाच आहे असं मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बोलून दाखवलं आहे.

शरद पवार पंतप्रधान पदासाठी योग्य

रणनीतीकर प्रशांत किशोर आणि राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीमुळे अनेक राजकीय चळवळींना उधाण आलं आहे. तिसऱ्या आघाडीची चर्चाही रंगली होती. मात्र काँग्रेस काय किंवा शिवसेना काय यांना घेतल्याशिवाय तिसरी आघाडी होऊ शकत नाही असं मत खुद्द शरद पवार यांनीच व्यक्त केलं होतं. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाला. या निवडणुका नमो विरुद्ध रागा अशा म्हणजेच नरेंद्र मोदी विरूद्ध राहुल गांधी अशा लढल्या गेल्या. या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांनी या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून अध्यक्षपद सोडलं. आता सोनिया गांधी अध्यक्ष आहेत आणि राहुल गांधी यांच्याकडे कोणतंही पद नाही. त्यामुळे आता २०२४ च्या दृष्टीन तयारी सुरू झाली आहे.

नरेंद्र मोदींना पर्याय म्हणून शरद पवार

विरोधकांना टक्कर देण्यासाठी शिवसेना ही नेहमीच सक्षम असते. विरोधकांची आघाडी मोदींच्या विरोधात उभी करायची असेल आणि भाजपला तसंच नरेंद्र मोदींना पर्याय म्हणून जर कोणता चेहरा हवा असेल तर तो शरद पवार यांचा चेहरा आहे. तेच पंतप्रधानपदाचे योग्य उमेदवार ठरू शकतात असं आता संजय राऊत यांनी म्हटलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाला. उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. आता असाच प्रयोग जर देशपातळीवर करायचा असेल तर त्यासाठीचा योग्य चेहरा शरद पवारच आहेत असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#CoronaVirus | राज्याची चिंता वाढली, कोरोनाबाधितांचा आकडा ४०० पार

News Desk

पत्रकार हत्येप्रकरणी राम रहीम दोषी

News Desk

दिल्लीतील CBI मुख्यालयाला लागली आग,५ बंब दाखल

News Desk