HW News Marathi
महाराष्ट्र

पंकजा मुंडेची मोठी घोषणा,राजीनामे नामंजूर,पुढची वाटचाल ठरली !

मुंबई। पंकजा मुंडे समर्थकांनी राजीनामा सत्रं सुरू केल्याने त्या पार्श्वभूमीवर आता पंकजा मुंडे आणि बिडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी आता कार्यकर्त्यांची संवाद साधला यावेळी त्यांनी पंकजा मुंडे वेगळा निर्णय घेण्याची शक्यता फेटाळून लावली. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी तळागाळापर्यंत पक्ष पोहोचवला. काँग्रेसची सत्ता असतानाही त्यांनी राज्यात मोठं काम केलं. त्यामुळे खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न दिल्याने भाजपचे अनेक पदाधिकारी नाराज झाले आहेत. त्यांच्या भावना तीव्र झाल्या आहेत. त्यातही प्रीतम मुंडे दुसऱ्यांदा निवडून आल्या तर भागवत कराड एका वर्षापूर्वीच खासदार झाले. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र झाल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर या दोघंही मुंडे भगिनी यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

महाराष्ट्रातून आले कार्यकर्ते-

प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही. त्यामुळे मुंडे समर्थक नाराज होणं स्वाभाविक आहे. याच वेळी पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांशी भेटीचे आयोजन आज (१३जुलै) केलं होत. आणि आजच्या भेटीसाठी तमाम महाराष्ट्रातील कार्यकर्ते या ठिकाणी जमले आहेत, पुढे बोलताना पंकजा मुंडे असेही म्हणाल्या की, इथे स्टेज छोटा आहे मात्र मी माझा कार्यकर्त्यांचे पाया पडून ऋण फेडू इच्छिते असं देखील मुंडे कार्यकर्त्यांसमोर व्यक्त झाल्यात

दिवंगत गोपीनाथ मुंडे साहेबांचं स्वप्न होतं की प्रत्येक सामान्यातल्या सामान्य माणसाला मंच उपलब्ध करून द्यायचं हेच त्यांचे ध्येय होतं.

मुंडे साहेबांनी राजकारणात आणलं-

बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने तमाम महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांच्या भावना अनावर झाल्या आणि बीडमध्ये राजीनामासत्र देखील सुरू होतो आतापर्यंत ७७ कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले आणि त्यानंतर पंकजा मुंडे प्रीतम मुंडे यांना कार्यकर्ते भेटलेत, याप्रसंगी पंकजा मुंडे असं देखील म्हणाल्या मुंडे साहेबांनी मला राजकारणात आणलंय ते म्हणजेच सामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी मला मंत्री करा संत्री करा माझ्या बहिणीला अर्थातच प्रीतमला काही करा असे संस्कार दिवंगत मुंडे साहेबांनी आम्हाला दिले नाहीत असेदेखील म्हणायला पंकजा मुंडे विसरल्या नाहीत.

गोपीनाथ मुंडे नाव विसरु देणार नाही-

माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांच्या भेटीत महाराष्ट्रातील तमाम कार्यकर्त्याला धीर दिला आहे माझं कुटुंब म्हणजे तमाम माझे कार्यकर्तेच आहेत असं म्हणत कार्यकर्त्यांच्या मनात पंकजा यांनी घर केलंय, गोपीनाथ मुंडे हे नाव मी जगाला विसरु देणार नाही असेदेखील सूचक विधान पंकजा मुंडे यांनी केलं आहे.

राजीनामे नामंजूर-

बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात डावलण्यात आल्याने तमाम महाराष्ट्रातील कार्यकर्ते आक्रमक झाले होते आणि याच पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी राजीनामासत्र देखील गेल्या दोन दिवसांपासून सुरू केलं होतं मात्र या कार्यकर्त्यांच्या भेटीत पंकजा मुंडे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे कार्यकर्त्यांचे राजीनामे नामंजूर देखील केले. पंकजा मुंडे यांनी सर्व पदाधिकार्‍यांचे राजीनामे नामंजूर करून आता सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भीमा-कोरेगाव | पाच जणांची नजरकैद कायम

News Desk

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्वागत – महेश तपासे

News Desk

“मी राजवाडा सोडून शेतकऱ्याच्या बांधावर आलोय, मंत्र्यांनी यावं की नाही हा त्यांचा प्रश्न” – संभाजीराजे

Manasi Devkar