HW News Marathi
महाराष्ट्र

शरद पवारांचा जबरा फॅन, पाठीवर गोंदवला पर्मनंट टॅटू

बारामती | एखादा नेता आपला लाडका असला कि लोक वाटेल ते करतात त्याच्या साठी. असंच राजकारणातलं अनेक लोकांचं आवडतं व्यक्तिमत्व म्हणजे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार. बारामतीतील त्यांच्या एका चाहित्याने त्याचा संपूर्ण पाठीवर शरद पवारांचा पर्मनंट टॅटू काढला आहे. अक्षय साळवेच्या पाठीवरील टॅटू पाहून खुद्द पवारांनीही त्याचं कौतुक केलं.

सातारा सभेमुळे प्रेरित

महाराष्ट्राच्या १४ व्य विधानसभा निवडणुकीत पावसात उभं राहून केलेल्या भाषणामुळे शरद पवार अनेक चर्चांमध्ये आले होते.विधानसभा निवडणुकांच्या वेळी साताऱ्यामध्ये शरद पवार यांनी प्रचार सभा घेतली होती. या सभेत पाऊस आल्यानंतरही शरद पवारांनी पावसात भिजत सुरु ठेवलेले भाषण प्रचंड गाजले होते. यामुळे अनेक जण प्रभावित झाले होते. हे दृश्य पाहून अक्षयही भारावून गेला होता. त्याच वेळी अक्षयने मुंबईत हा टॅटू काढून घेतला होता.

पवारांनी केला कौतुक

पाठीवरील ही कारागिरी खुद्द शरद पवार यांनी पाहावी, अशी अक्षयची मनापासून इच्छा होती. गेली दीड वर्ष तो शरद पवार यांच्या भेटीच्या प्रतीक्षेत होता. अखेर रविवारी ही संधी चालून आली. अक्षयने शरद पवारांची काल भेट घेतली. दीर्घ काळाच्या प्रतीक्षेनंतर अक्षयने शरद पवारांना आपल्या पाठीवर काढेलला टॅटू दाखवला. यावेळी शरद पवारांनीही अक्षयचे कौतुक केले

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मुख्यमंत्र्यांनी पाठवलेलं पत्र म्हणजे महाराष्ट्राचं दुर्दैवं”, चित्रा वाघ यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा!

News Desk

देशाचे आधारस्तंभ घडविण्याचे काम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या उपकेंद्राद्वारे होणार! मुख्यमंत्री

News Desk

मोहरम निमित्ताने मिरवणूका काढता येणार नसल्याच्या गृह विभागाच्या सूचना!

News Desk