HW News Marathi
महाराष्ट्र

देशात पेट्रोलचे भाव भिडले गगनाला, तर डिझेलच्या दरात काहीशी घट

नवी दिल्ली | पेट्रोलचे दर काही दिवसांपासून सतत वाढत आहे आणि त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होताना दिसत आहे. कोरोना काळामध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत आणि यात आता पेट्रोल मध्ये सातत्याने होत असलेले दर वाढ, मात्र डिझेल मध्ये घट होताना दिसत आहे. देशातील सर्व महानगरातील पेट्रोलच्या दराने शंभरी पार केली आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगाना, तमिलनाडू, कर्नाटक, जम्मू आणि कश्मीर, ओडिशा, केरळ, बिहार, पंजाब, लड्डाख, सिक्किम आणि दिल्ली या ठिकाणी पेट्रोलचे दर शंभर रुपयांच्या वरती गेले आहेत.

काय आहेत नवीन भाव?

शहर डिझेल पेट्रोल

दिल्ली ८९.७२ १०१.१९

मुंबई ९७.२९ १०७.२०

कोलकाता ९२.८१ १०१ .३५

चेन्नई ९४.२४ १०१.९२

पेट्रोल २८ पैशांनी महाग झालं असून मुंबईमध्ये पेट्रोलची किंमत १०७.२० रुपयांवर गेली आहे तर डिझेलची किंमत १७ पैशांनी घटून ती ९७.२९ रुपयांवर पोहोचली आहे. दिल्लीमध्ये आज पेट्रोलची किंमत १०१.२३ रुपयांवर गेली आहे तर डिझेलच्या दरात १६ पैशांनी घट झाली असून त्याची किंमत ८९.७६ रुपये इतकी झाली आहे.

देशात पेट्रोल मध्ये सातत्याने वाढ

देशात १५ जून २०१७ पासून इंधनाचे दर रोज बदलण्यास सुरुवात झाली. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आता भारतातील तेल कंपन्या ठरवतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रत्येक क्षणाला तेलाच्या किंमती बदलत असतात. त्यामुळे देशात आता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती दर दिवशी सकाळी सहा वाजता बदलतात.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गोहत्याबंदीबाबत फेरविचार शक्य – माधव भांडारी

News Desk

बाबा आमटे यांची नात डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या

News Desk

“फडणवीसांनी फालतू राजकारण करणं सोडावं”, राऊतांचा खोचक सल्ला

News Desk