HW News Marathi
देश / विदेश

पंकजा मुंडे आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला, उधाण

नवी दिल्ली | केंद्रिय मंत्रीमंडळात खासदार प्रीतम मुंडे यांना जागा न दिल्याने मुंडे भगिनी नाराज असल्याचं सांगितलं जात होतं. अशात आज अचानक पंकजा मुंडे दिल्लीत गेल्याने चर्चा सुरू झाल्या होत्या. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेण्यासाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे अचानक दिल्लीत आल्या होत्या. त्यांनतर त्या आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला गेल्या आहेत. त्यांच्यासोबत जेपी नड्डाही आहेत. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्याकडे संघटनात्मक पातळीवर मोठी जबाबदारी मिळणार असल्याची जोरदार चर्चा दिल्लीत वर्तवली जात आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर आज (११ जुलै) भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी आज भाजपच्या सर्व राष्ट्रीय सचिवांची बैठक बोलावली होती. त्यामुळे पंकजा मुंडे या दिल्लीत दाखल झाल्या होत्या. मात्र, पंकजा मुंडे अचानक दिल्लीत आल्याने चर्चांना उधाण आलं होतं. दिल्लीत नड्डा यांच्यासोबतची बैठक पार पडल्यानंतर पंकजा मुंडे या पंतप्रधानांच्या निवासस्थानी गेल्या आहेत. त्यांच्ंयासोबत जेपी नड्डा आणि पक्षाचे इतर राष्ट्रीय सचिवही उपस्थित आहेत.

मोदी सचिवांशी संवाद साधणार

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भाजपच्या सर्व राष्ट्रीय सचिवांशी चर्चा करणार आहेत. आगामी उत्तर प्रदेश आणि गुजरातच्या निवडणुका आणि त्यानंतर होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदी या सचिवांशी संवाद साधणार आहे. पक्षाची संघटनात्मक बांधणी, सरकार म्हणून केलेली कामे याबाबत या सचिवांशी मोदी चर्चा करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रताप सरनाईकांना आणखी एक धक्का ! पूर्वेश सरनाईकही ED च्या निशाण्यावर

News Desk

“बेळगावमध्ये शिवरायांचा पुतळा काँग्रेस नेत्याने हटवलाय, शिवसेना राजीनामा देणार का ?”

News Desk

पुलवामामध्ये २ दहशतवादी ठार

News Desk