HW News Marathi
Covid-19

झिका व्हायरसने वाढवली देशाची चिंता; हाय अलर्ट जारी

नवी दिल्ली। देशात गेली दीड वर्श कोरोना विषाणू थैमान घालत आहे. तिसऱ्या लाटेची संभावना दर्शवत असताना, डेल्टा प्लस व्हेरिएन्ट ने थैमान घालायला सुरुवात केली आहे. सध्या देशात एका नवीन विषाणूने थैमान घालायला सुरुवात केली आहे. झिका व्हायरसचा प्रादुर्भावही वाढताना दिसत आहे. यामुळे प्रशासनाची झोप उडाली आहे. केरळमध्ये झिका व्हायरसचे १५ रुग्ण आढळून आले आहेत. केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी यासंदर्भात माहिती दिली. याआधी राज्यात १४ रुग्णांची नोंद होती. आता हा आकडा १५ वर पोहोचला आहे.

राज्यात हाय अलर्ट जारी

कोरोना आणि डेल्टा सर्वत्र थैमान घालताच आहेत . यात आता झिका व्हायरसची लक्षणे आणि परिणामांवर काटेकोरपणे लक्ष ठेऊन आहोत. राज्य सरकार हाय अलर्टवर आहे. केरळमध्ये झिका व्हायरसचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी ऍक्शन प्लॅनवर काम केले जात आहे. सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीवर गंभीरतेने लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे, असे आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले आहे.

परिस्थिती नियंत्रणात

आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले की, राज्य सरकारजवळ झिका व्हायरसवर मात करण्याचा प्लॅन तयार आहे. आम्ही यासाठी पूर्ण तयारी करत आहोत. केंद्र सरकारची टीम राज्यात येऊन पाहणी करण्याची शक्यता आहे. परंतु या व्हायरसबाबत भीती निर्माण होण्यासारखे काही नाही. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.

झीका चा पहिला बळी

केरळ मध्ये झिका विषाणूचा पहिला रुग्ण सापडला. झिका व्हायरसची लक्षणे आणि परिणामांवर काटेकोरपणे लक्ष ठेऊन आहोत. राज्य सरकार हाय अलर्टवर आहे. केरळमध्ये झिका व्हायरसचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी अॅक्शन प्लॅनवर काम केले जात आहे. सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीवर गंभीरतेने लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे, असे आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांचा होम आयसोलेशनचा निर्णय सरकारने केला रद्द – राजेश टोपे

News Desk

जाणून घ्या…यंदाचे शैक्षणिक वर्ष असे असणार

News Desk

स्थलांतरित मजुरांना घरी घेऊन जाणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात, २३ जणांचा मृत्यू

News Desk