HW News Marathi
महाराष्ट्र

‘आमचं ठरलंय! विधानसभेचं अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार’, शरद पवारांचं स्पष्टीकरण

बारामती। महाराष्ट्रा मध्ये सध्या महाविकासआघाडी पक्षांमध्ये विधानसभेच्या अध्यक्षपदावरून चर्चा सुरु आहेत. यातच आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी एक मोठी घोषणा केली आहे. विधानसभेचे अध्यक्षपद हे काँग्रेस पक्षाकडेच राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा तिढा निकालात काढला. आमचा तीन पक्षांचा निर्णय स्वच्छ झालाय, विधानसभेचे अध्यक्षपद हे काँग्रेसकडे राहील. त्यामुळे कुणीही काही बोलायचा संबध नाही. तिन्ही पक्षांनाही काँग्रेसचा अध्यक्ष मान्य आहे, त्या निर्णयावर कायम आहोत, असे शरद पवार यांनी सांगितले.

राजकीय पक्ष मोठा करण्याचा प्रयत्न करणार की नाही?

महाविकासआघाडी पक्ष जरी एकत्र असले तरी त्यांच्यात चढाओढ हि कायम सुरूच असते. महाविकासआघाडीतील पक्षांनी स्वबळाची भाषा करण्यात काहीही गैर नाही, असे शरद पवार यांनी म्हटले. प्रत्येकजण आपला राजकीय पक्ष मोठा करण्याचा प्रयत्न करणार की नाही? त्यामुळे ते आपलं बळ वाढवण्याचा प्रयत्नात असणार. आम्ही सरकार एकत्र चालवतो, याचा अर्थ आम्ही पक्ष एकत्रित चालवत नाही. पक्ष आम्ही प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने चालवतो. प्रत्येकाला आपल्या पक्षाची व्याप्ती वाढावी अशी इच्छा असणार.. यात काहीही चुकीचे नाही, असे शरद पवार यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान मोदींच्या सभेपूर्वी खारघरमधील खड्डे प्रशासनाने भरले

News Desk

देगलूरमध्ये जितेश अंतापूरकरांना सहानुभूतीची फायदा झाला! – रामदास आठवले

News Desk

मराठा आरक्षणावर आज उच्च न्यायालयात सुनावणी

News Desk