HW News Marathi
महाराष्ट्र

एकनाथ खडसे ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार

मुंबई | तुम्ही ईडीची चौकशी मागे लावाल तर मी सीडी लावेल, असा इशारा देत भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंना आज सकाळी ईडीचं समन्स आलं आहे. आज सकाळी 11 वाजता चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश एकनाथ खडसेंना देण्यात आले आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरुन, एकनाथ खडसेंची प्रकृती खालावल्यामुळे त्यांची आजची पत्रकार परिषद रद्द केल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, पत्रकार परिषद जरी रद्द झाली असली तरी एकनाथ खडसे हे ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास रवाना झाले आहे.

पत्रकार परिषद रद्द केल्यानंतर एकनाथ खडसे आज चौकशीसाठी ईडी कार्यालयात उपस्थित राहणार का? असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात होता. मात्र, आज (८ जुलै) पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी चौकशीला जाणार असल्याची माहिती दिली आहे.  यापूर्वी जानेवारी महिन्यात ईडीनं एकनाथ खडसेंची चौकशी केलेली आहे. तसेच काल एकनाथ खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“केम छो वरळी…” संदीप देशपांडेंचा आदित्य ठाकरेंवर निशाणा!

News Desk

शिवसेना नाव काढून टाका आणि ठाकरे सेना करा !

News Desk

‘संयम सोडू नका’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं व्यापाऱ्यांना आवाहन!

News Desk