HW News Marathi
महाराष्ट्र

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीकडून अटक

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीने अटक केली आहे. 2016 मध्ये पुण्यातील भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी व्यवहारप्रकरणी तपास करत असलेल्या ईडीने चौधरी यांची रात्रभर कसून चौकशी केल्यानंतर ही कारवाई केली. ईडीच्या या कारवाईमुळे येत्या काळात एकनाथ खडसे यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

भोसरी येथील एमआयडीसी भूखंड घोटाळाप्रकरणी माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी, जावई गिरीश चौधरी, यांच्यासह इतरांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला होता. खडसे यांच्यावर पदाचा दुरुपयोग करून हा जमीन व्यवहार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. तर, ही जमीन शारदा खडसे यांच्या नावावर असून आर्थिक व्यवहाराबद्दलही त्यांच्यावर आरोप आहेत.

भाजपला रामराम करत एकनाथ खडसे राष्ट्रवादीमध्ये आले होते. यानंतर ईडीने भोसरी जमीन व्यवहारप्रकरणी एकनाथ खडसे यांना नोटीस बजावली. पुढे ईडीने तपास सुरू ठेवला. ईडीने खडसे यांचे जावई चौधरी यांना मंगळवारी चौकशीसाठी बोलावले होते. रात्री उशिरापर्यंत चौधरी यांच्याकडे चौकशी केल्यानंतर ईडीने त्यांना अटक केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसल्यावर राऊत यांना देशद्रोही विचारच सुचणार – अतुल भातखळकर

News Desk

फळभाज्यांचे भाव गगनाला

News Desk

“….तर या विरोधात कोर्टात चॅलेंज करणार” – समीर वानखेडे

News Desk