HW News Marathi
महाराष्ट्र

‘मराठा आरक्षण मिळालं तरीही आम्ही मोर्चे काढू’, नरेंद्र पाटलांचा इशारा

सोलापूर । मराठा आरक्षणाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्याचे पडसाद सर्वत्र दिसू लागले आहेत. मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे अशी घोषणा देत अनेक ठिकाणी मोर्चे काढले जात आहेत. मराठा आरक्षणानंतर आता ओबीसी आरक्षावरून वाद सुरु आहे. या सगळ्या प्रकारावरून आज (२ जुलै) सोलापुरात माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी एक वादग्रतस्त वक्तव्य केलं आहे .

पाटील नेमकं काय म्हणाले?

“येत्या काही महिन्यांत राज्यात सत्तांतर झाले तरी आम्ही मोर्चा काढणार आहोत. सोलापुरात 4 जुलै रोजी मराठा क्रांती आक्रोश मोर्चा निघणार आहे. शरद पवारांचा काळ, काँग्रेस-राष्ट्रवादीचा आघाडीचा काळ पाहिला तर त्यांचा द ग्रेट मराठा असा उल्लेख होतो. परंतू शरद पवारांनी मराठ्यांच्या बाजूने भूमिका घेतली नाही. यामुळे पवारांनी मराठा आरक्षणाबाबत त्यांची भूमिका स्पष्ट करावी. आरक्षण रद्द झाल्यानंतर शरद पवारांनी काहीही भूमिका घेतली नाही,” असा आरोप त्यांनी केला आहे. केंद्रीय कायदा मंत्री यांची भेटीसाठी वेळ घेऊन त्यांना मराठा आरक्षणाबाबत कायदा करण्यासाठी विनंती करणार आहे, असे ते म्हणाले आहेत.

मराठा आरक्षण प्रकरणी केंद्र सरकारला मोठा दणका, पुनर्विचार याचिका फेटाळली

मराठा आरक्षणाचा वाद सुरू असताना आता मोठी अपडेट समोर येत आहे. सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारला मोठा दणका दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारची मराठा आरक्षण प्रकरणी पुनर्विचार याचिका फेटाळली आहे. 102 व्या घटना दुरुस्ती संदर्भात केंद्र सरकारनं याचिका दाखल केली होती. 102च्या घटना दुरुस्ती संदर्भात केलेली ही पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. पुनर्विचार करण्याची गरज नाही असंही सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. त्याने आपल्या आदेशातून याबाबत स्पष्ट केल्यानं आता केंद्र सरकारला मोठा दणका बसला आहे.  गेल्या काही दिवसांपासून सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावरून वाद सुरू आहे. मराठा आरक्षणावरून आम्हाला कोणतंही राजकारण करायचं नाही असंही यावेळी अशोक चव्हाण म्हणाले. प्रश्न मार्गी लावायचा असेल त्यासाठी आता ठोस पावलं उचलायला हवीत.येणाऱ्या अधिवेशनात हा प्रश्न मार्गी लावावा असंही अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मी नीतिमत्ता गहाण ठेऊन राजकारण करणार नाही !

News Desk

महाराष्ट्रामध्ये पण कोणालाही पवार कुटुंबावर विश्वास नाही, निलेश राणेंचे रोहित पवारांना प्रत्युत्तर 

News Desk

डोवालांवर आरोप करत देशमुखांचे ‘फेसबुक लाईव्ह’ रद्द, राजकीय वर्तुळात चर्चा

News Desk