HW News Marathi
महाराष्ट्र

जरंडेश्वर तर हिमनगाचे टोक, अमित शाहांना पत्र लिहितोय, सगळी नावं समोर येतील!

पुणे | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणीत काहीशी वाढ होण्याची चिन्ह दिसतं आहेत. याचं कारण असं की भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील अजित पवारांच्या मागे हात धुऊन लागल्याचं दिसत आहे. या आधीही अजित पवारांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी चंद्रकांत पाटलांनी केली होती. यासाठी केंद्री गृहमंत्री अमित शाह यांना पत्रही दिलं होतं. आता जरंडेश्वर साखर कारखान्यावरुन चंद्रकांत पाटलांनी अजित पवारांना घेरलं आहे.

“ जरंडेश्वर साखर कारखान्यावर ईडीची कारवाई हे हिमनगाचे टोक आहे. हा विषय जरंडेश्वरपुरता मर्यादित नाही. मी याबाबत गृहमंत्री अमित शाहांना पत्र लिहितोय, लिलावात विकल्या गेलेल्या सर्व कारखान्यांची चौकशी करण्याची मागणी करणार आहे”, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. ते आज (२ जूलै) पुण्यात बोलत होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नातेवाईक असलेल्या राजेंद्र घाडगे यांच्या साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर ईडीने कारवाई केली आहे. जरंडेश्वर शुगर्स या कारखान्याची तब्बल 66 कोटी रुपयांची मालमत्ता सील करण्याचे आदेश ईडीकडून देण्यात आले आहेत. याबाबत चंद्रकांत पाटील म्हणाले, “मी कोणाला धमकी देत नाही, पण हा विषय जरंडेश्वरपुरता मर्यादित नाही. एक एक नाव समोर येईल. लिलावात विकल्या गेलेल्या सर्व कारखान्यांची चौकशी करावी. त्याबाबत मी गृहमंत्री अमित शाहांना पत्र लिहितोय”

अजित पवार काय म्हणाले?

अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या मामाच्या साखर कारखान्यावर करण्यात आलेल्या कारवाईवर प्रतिक्रिया व्यक्त केली. या कारखान्याच्या खरेदी-विक्रीसह कारखान्याच्या नफ्या-तोट्याचीही माहिती दिली. आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो, सुंदरबाग सोसायटीने याबाबत याचिका दाखल केली होती. त्यात 14 कारखान्यांमध्ये जरंडेश्वर कारखाना होता. 2016 आणि 2017 मध्ये सर्व रितसर परवानग्या घेतल्या होत्या. माझ्याच नातेवाईकांचा तो कारखाना आहे. ईडीला चौकशी करण्याचा पूर्ण अधिकार आहे. यापूर्वी सीआयडीने चौकशी केली त्याच्यातून काही निष्पन झालं नाही. सगळीकडून पॉझिटिव्ह गोष्टी झाल्या आहेत. त्यासंदर्भात ज्यांच्याकडे न्याय मागण्यासाठी जायचं आहे तिकडे जाणार, वकिलांचा सल्ला घेऊन अपिलामध्ये जातील, असं अजितदादा म्हणाले.

काय आहे जरंडेश्वर कारखाना प्रकरण?

जरेंडेश्वर सहकारी साखर कारखाना हा सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील चिमणगाव येथे आहे. सध्याच्या मालकांनी हा कारखाना 2010 सालात 65 कोटी 75 लाख रुपयांना खरेदी केला होता. हा कारखाना सध्या मेसर्स गुरू कमोडिटी सर्विसेस प्रा. लि यांच्या मालकीचा आहे. हा कारखाना मेसर्स जरेंडेश्वर शुगर मिल प्रा लिमिटेडला भाड्याने देण्यात आला आहे. मेसर्स जरडेश्वर प्रा लिमिटेड कंपनीत मेसर्स सपार्किंग सोईल प्रा लिमिटेड कंपनी ही भागीदार कंपनी आहे. ईडीने केलेल्या तपासात मेसर्स स्पार्कलिंग कंपनी ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित आहे.

जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना हा प्रथम मेसर्स गुरू कमोडीटी प्रा ली कंपनीने विकत घेतला होता. मात्र, ही गुरू कमोडिटी कंपनी डमी कंपनी असल्याचा ईडीच्या अधिकाऱ्यांना संशय आहे. जरंडेश्वर शुगर मिल प्रा ली ने पुणे जिल्हा कॉ ऑप बँकेकडून सुमारे 700 कोटी रुपये लोन घेतलं आहे. हे कर्ज 2010 पासून पुढील काळात घेतलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अभिनेता डिनो मोरियाची संपत्ती जप्त, ईडीची कारवाई

News Desk

संजय राऊत चंद्रावर, सुर्यावर, मंगळावर कशावरही भाष्य करु शकतात – चंद्रकांत पाटील

News Desk

विरोधकांना नमवण्यासाठीच ईडीचा वापर, काळ जाईल तेव्हा बघू, ईडीच्या कारवायांवरून शरद पवारांचा इशारा!

News Desk