HW News Marathi
देश / विदेश

अमित शहांच्या मुलाची प्रॉपर्टी १० पटींनी वाढली, पण ED चौकशी होणार नाही !

मुंबई । केंद्रीय तपास यंत्रणांमुळे महाविकासआघाडी सरकारमधील अनेक मंत्र्यांची कोंडी होत आहे. “ED, CBI चौकशीची भिती दाखवून राज्य सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे”, असा आरोप याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज (१ जुलै) केला आहे. एकीकडे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपूरमधल्या घरांवर नुकताच ED छापे टाकले आहेत. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्या CBI चौकशीची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. दरमयन, या मुद्द्यावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये

वारंवार जुंपत आहे.

नाना पटोले यांनी भाजपला आणखी एका मुद्द्यावरून सुनावले आहे. राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या ED चौकशीच्या मागणीवरून नाना पटोले यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. नाना पटोले यावेळी बोलताना म्हणाले की, “आरोप तर सर्वांवरच होतात. नरेंद्र मोदींवरही आरोप झाले आहेत. प्रधानमंत्री सहाय्यता निधीत झालेल्या भ्रष्टाचारावर मोठ्या प्रमाणावर आरोप झाले आहेत. मग मोदींचीही ED ची चौकशी व्हावी. लोकांच्या पैशाचा दुरुपयोग करणाऱ्याची नक्कीच चौकशी व्हायला हवी. इथे भाजपकडून

निरपराध लोकांवरही ED, CBI चौकशी लावण्याचा प्रयत्न होत आहे. अमित शहांच्या मुलाची प्रॉपर्टी १० पटींनी वाढली. पण त्यांची ED चौकशी करणार नाही. भाजप या तपास यंत्रणांचा दुरुपयोग करत आहे”, अशा शब्दांत नाना पटोलेंनी भाजपला सुनावले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘महिला कमांडोज आणता ही कसली मर्दानगी?’- संजय राऊत

News Desk

दहशतवाद्यांनी केले काश्मीरमधील पोलिसांच्या नातेवाईकांचे अपहरण

swarit

अस्तित्व मिटवण्याचे अनेक प्रयत्न झाले, मात्र राम आजही आपल्या मनात आहेत – पंतप्रधान

News Desk