HW News Marathi
Covid-19

तिसरी लाट तिशीच्या आतील तरुणांसाठी धोक्याची; टास्क फोर्सच्या सल्ल्याने अजित पवारांची माहिती

नाशिक। कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा सामना राज्यातील नागरिकांनी निमूटपणे केला, आणि अश्यातच आता कोरोनाची तिसरी लाट आली तर ती वय वर्ष ३० पर्यंतच्या अर्थातच तिशीच्या आतील तरुणांसाठी धोकादायक असेल, असं टास्क फोर्सने सांगितलं आहे. म्हणून सावध राहा, असं आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.

पवार आज नाशिकच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत हा इशारा राज्यातील जनतेला दिलाय. सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. असं संकट यापूर्वी कधीच आलं नव्हतं, असं सांगतानाच आता तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. ही लाट आली तर ३० वयोगटातील आतील लोकांना अधिक धोका असेल असं टास्क फोर्सने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेत ऑक्सिजनची कमतरता भासू नये म्हणून जिल्ह्यातच ऑक्सिजन प्लांट उभारण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असं देखील अजित पवार यांनी सांगितलं.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत ६० वर्षांवरील लोक बाधित झाले होते. दुसऱ्या लाटेत ३० ते ६० वयोगटातील लोकांना कोरोनाची बाधा झाली होती, असं अजित पवार नाशिक दौऱ्यात म्हणाले, पुढच्या दोन महिन्यात ७० टक्के लसीकरण करण्याचा राज्य सरकारचा मानस असल्याचं अजित पवार म्हणाले. मात्र, एवढ्या लस नाहीत. तरीही आम्ही हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, . कोरोना कामात निधीची कमतरता भासू नयेत असा आमचा प्रयत्न आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई लोकलची संख्या वाढवली, तब्बल ३५० लोकल रुळावर

News Desk

आज ७७८ नवीन रुग्णांचे निदान, राज्यातील कोरोना बाधितांची संख्या ६४२७ । राजेश टोपे

News Desk

“माझं दिल्लीकरांना हात जोडून आवाहन आहे की…”

News Desk