HW News Marathi
महाराष्ट्र

“प्रस्थापितांचा बहुजनांवर हमला, पण…”, रोहित पवारांचा फोटो ट्विट करत पडळकरांचा इशारा

मुंबई। भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर बुधवारी(३०जूनला) रात्री दगडफेक झाली. दगडफेकीनंतर पडळकर चांगलेच आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादीला इशारा देताना दगडच काय गोळी घातली तरी मी शांत बसणार नाही, असा पवित्रा पडळकर यांनी माध्यमांशी बोलताना घेतला होता. त्यानंतर आज (१जुलै) माध्यमांशी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीला टार्गेट केलं आहे. त्यानंतर आता राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळते. पडळकर यांच्या गाडीवर दगडफेकी नंतर प्रतिक्रिया देत प्रस्थापितांचा बहुजनांवर हा हल्ला असल्याचे त्यांनी यावेळी म्हटलंय.

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार असतील किंवा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करताना दिसतात. शरद पवारांवर केलेल्या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुद्धा चांगलाच आक्रमक झालेला पाहायला मिळाला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी पडळकर यांना चांगलंच धारेवर धरलं होतं त्यानंतर गोपीचंद पडळकर यांनी या सगळ्या घटनेवर गाडीवर झालेल्या दगडफेकीनंतर काल (३०जून) रात्री उशिरा एक ट्विट केले.

प्रस्थापितांचा बहुजनांवर हल्लाच

प्रस्थापितांचा बहुजनांवर हा हल्ला आहे असं पडळकर यांनी या घटनेची बाजू मांडली. मात्र या भ्याड हल्याने बहुजनांचा आवाज ना काल दबला होता, ना आज दबला आहे, ना उद्याही दबेल… घोंगडी बैठका या सुरूच राहणार…. असा इशारा गोपीचंद पडळकर यांनी ट्विटद्वारे दिलाय. या ट्विट बरोबर रोहित पवार आणि एका कार्यकर्त्याचा फोटो देखील त्यांनी शेअर केलाय म्हणून पडळकरांचा रोख रोहित पवार यांच्या कडे असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत.

राष्ट्रवादीच्या पुरोगामीत्वाचा बुरखा फाडला गेला

गोपीचंद पडळकर माध्यमांशी बोलताना म्हणाले की, “या घटनेने राष्ट्रवादीच्या पुरोगामीत्वाचा बुरखा फाडला गेला आहे. राष्ट्रवादीचा खरा चेहरा समोर आलं आहे. शरद पवार महाविकास आघाडीचे मार्गदर्शक आहेत, तर त्यांनी मुद्द्यांवर भाष्य करावं. मराठा आरक्षण रद्द झालं, ओबीसी आरक्षण गेलं, यावर शरद पवार का बोलत नाहीत? मी ग्रामीण भाषेत बोललो, त्यात वावगं काय?”, असेही प्रश्नही त्यांनी उपस्थित केले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“सरकार वाझेंना का पाठिशी घालतंय?”, फडणवीसांचा सवाल  

News Desk

राज्यात सर्वसामान्यांना न्याय देणारे शासन कार्यरत! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna

सोलापुरातील कार्यक्रमात नितीन गडकरी यांना भोवळ

News Desk