HW News Marathi
महाराष्ट्र

“शरद पवारांबाबतची अशी वक्तव्य इथून पुढे खपवून घेतली जाणार नाही”, लंकेंनी घेतला पडळकरांचा समाचार

अहमदनगर |राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी भाजपाचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. शरद पवार देशातील सुसंस्कृत नेतृत्व आहे. त्यांच्यावर खालच्या शब्दात बोलणं शंभर टक्के चुकीचं असल्याचं सांगत अशी वक्तव्य इथून पुढे खपवून घेणार नाही, असा इशाराच पडळकरांना दिला आहे. गोपीचंद पडळकर कायमच शरद पवार आणि महाविकासआघाडी सरकारवर कायम टीका करताना दिसत असतात.

निलेश लंकेंकडून पडळकरांचा समाचार

गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर खालच्या शब्दात केली. ‘रात गेली हिबेशात, पोरगं नाही नशिबात’, अशा शब्दात त्यांनी पवारांवर हल्ला चढवला. पवारांच्या पंतप्रधानपदाच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी एकामागोमाग एक शाब्दिक वार केले. तसंच सगळे जण पवारांना मोठा नेता मानत असतील पण मी मानायला तयार नाही, असंही पडळकर म्हणाले. पवारांवर बोलताना पडळकरांची जीभ घसरल्याने राष्ट्रवादीचे नेते सध्या पडळकरांना तुटून पडले आहेत. अशातच लंकेंनी अशी वक्तव्य इथून पुढे खपवून घेतली जाणार नाही, असा उघड इशाराच पडळकरांना दिला आहे.

अशी वक्तव्य खपवून घेणार नाही, लंकेंचा इशारा

शरद पवार हे देशातील सुसंस्कृत नेतृत्व आहे. त्यांच्यावर अशा शब्दात बोलणं शंभर टक्के चुकीचं आहे. महाराष्ट्राची भूमी ही महिलांचा मानसन्मान करणारी भूमी असून अश्याप्रकारे वक्तव्य करणं हे लोकप्रतिनिधीला शोभत नाही. पडळकरांच्या वक्तव्याचा मी निषेध करत करतो. इथून पुढे बोलताना त्यांनी काळजी घ्यावी, अशी वक्तव्य आम्ही खपवून घेणार नाही, असं लंके यांनी म्हटलं आहे.

रात्री गाडीवर हल्ला, पडळकरांचं पुन्हा राष्ट्रवादीवर टीकास्त्र

“माझ्या राज्यभर घोंगडी बैठकांमुळे राष्ट्रवादी जागेवरून हललीय. मुद्द्यांची बात करणारी राष्ट्रवादी गुद्द्यांवर आलीय. राष्ट्रवादीचा खरा चेहरा लोकांसमोर आला आहे. बहुजनांवर अन्याय करणारे हे लोक आहेत. माझं शरद पवारांना आव्हान आहे की त्यांनी सांगावं, मुद्यावर बोलत असताना डोक्यात दगड घालायचं हे कोणत्या कलमात लिहलं आहे”, असा हल्लाबोल गोपीचंद पडळकर यांनी आज (१ जूलै) सोलापुरात बोलताना केली.

भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर काल रात्री दगडफेक झाली. दगडफेकीनंतर पडळकर चांगलेच आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादीला गर्भित इशारा देताना दगडच काय गोळी घातली तरी मी शांत बसणार नाही, असा पवित्रा पडळकर यांनी घेतला आहे. दगडफेकीनंतर आज सकाळी माध्यमांशी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीला लक्ष्य केलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“फडणवीसजी काय राव तुम्ही तुमच्यामुळे मुख्यमंत्र्यांना पण घराबाहेर यावं लागतं”, चित्रा वाघ यांचा टोमणा

News Desk

जाणून घ्या… शिंदे सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले ‘हे’ महत्त्वाचे निर्णय

Aprna

मार्चमधील अवकाळी पाऊस व गारपीट नुकसानीचे १ लाख ९९ हजार ४८६ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण

Aprna