HW News Marathi
Covid-19

वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ.तात्याराव लहाने सेवानिवृत्त!

मुंबई | प्रख्यात नेत्ररोग तज्ज्ञ, पद्मश्री, राज्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने हे काल (३० जून) सेवानिवृत्त झाले. कोरोनाकाळात लहाने यांनी केलेल्या कामाची पावती म्हणून त्यांना लवकरच वेगळी मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. गेली ३६ वर्ष ते शासकीय सेवेत होते. १ मार्च २०१९ मध्ये त्यांनी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या संचालक पदाचा पदभार स्वीकारला होता. त्याआधी ते जे.जे. मेडिकल कॉलेजचे डीन म्हणून काम पाहत होते.

रुग्णांसाठी धावून जाणारा त्यांना मदत करणारा डॉक्टर अशी त्यांची ख्याती आहे. ‘डोळ्याचे डॉक्टर म्हणजे लहाने’ अशी त्यांची महाराष्ट्रभर ओळख आहे. गोरगरिबांना आपलेसे करून त्यांच्यावर उपचार करण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यांच्यामुळे वैद्यकीय शिक्षण विभागाला आणि जे.जे.च्या नेत्र विभागाला वेगळी ओळख निर्माण झाली.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, गानसम्राज्ञी आशा भोसले अशा अनेक मान्यवरांनीदेखील विश्वासाने आपले डोळे त्यांच्याकडे सोपविले होते. ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांविषयी आपुलकी असल्याने त्यांना सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केले. त्यांच्या याच गुणवैशिष्ट्यांमुळे त्यांच्यावर वेगळी मोठी जबाबदारी सरकारमध्येच दिली जाईल, असे सांगितले जात आहे.

कोरोनाच्या काळात काम करताना त्यांनी खासगी प्रॅक्टिस करणारे डॉक्टर्स, रेसिडेंट डॉक्टर्स, बंधपत्रित डॉक्टर यांना आदेश देऊन त्यांच्या नियुक्त्या ग्रामीण व शहरी भागात केल्या. राज्यात कोरोनाची साथ सुरू झाली त्यावेळी ३ प्रयोगशाळा होत्या, त्यांच्या कार्यकाळात १३० शासकीय आणि १२४ खासगी प्रयोगशाळा निर्माण झाल्या. १७ मे १९८५ रोजी ते अधिव्याख्याता म्हणून अंबाजोगाई (जि. बीड) येथे सेवेत रुजू झाले. जे.जे. मधील नेत्र विभाग आणि डॉ. लहाने हे समीकरण अनेक वर्षांपासून आहे.

-६६७ शिबिरांमधून ३० लाखांवर रुग्णांची तपासणी करून त्यांनी उपचार केले. तसेच २० लाख रुग्णांवर जे.जे. रुग्णालयात उपचार केले.

– जे. जे. रुग्णालयामधील रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑफ थॅलमोजॉजी येथे होणाऱ्या शस्त्रक्रियांमध्ये ६०० पासून ते १९ हजार प्रतिवर्ष एवढ्या मोठ्या प्रमाणात गरीब व गरजू रुग्णांवर शस्त्रक्रिया त्यांनी केल्या.

– बारामती, नंदुरबार येथे मेडिकल महाविद्यालय सुरू करण्यासाठी प्रयत्न केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अदर पुनावाला कोरोना लस पुरवून एकप्रकारे देशसेवा करतायत – मुंबई हायकोर्ट

News Desk

देशावर महामारी आणि आर्थिक संकट येणार…काय आहे भेंडवळची भविष्यवाणी?

News Desk

खबरदारी घेऊ, पण दहीहंडी साजरी करु; मनसेचा निर्धार

News Desk