HW News Marathi
महाराष्ट्र

पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची अखेर बदली!

अहमदनगर। पारनेरचे तहसीलदार ज्योती देवरे यांची अखेर बदली झाली आहे. काही दिवसांपूर्वी ज्योती देवरे यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यानंतर देवरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला होता. लंके यांनी देवरेंवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. दरम्यान, ज्योती देवरे यांची बदली करण्यात आल्यानंतर लोकसेवकपदाचा गैरवापर केल्याचा आरोप असलेल्या पारनेरच्या (जि. नगर) तहसीलदार ज्योती देवरे या चौकशीत दोषी ठरल्या आहेत. त्यामुळे त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. पण देवरे यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

विविध आरोप तहसीलदार ज्योती देवरे यांच्यावर

पदाचा गैरवापर करून वाळूमाफियांना परस्पर कारवाईमुक्त करणे, बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्यांचे ट्रॅक्टर, डंपर, जेसीबी आणि पोकलेन मशिन जप्त केल्यानंतर तडजोड शुल्क सरकारला जमा न करता परस्पर मुक्त करणे असे विविध आरोप तहसीलदार ज्योती देवरे यांच्यावर आहेत. अशा विविध प्रकारे देवरे यांनी ५ कोटी ९४ लाख ९६ हजार ७२ रुपयांचा भ्रष्टाचार केल्याची तक्रार राज्याच्या लोकायुक्तांकडे ३० ऑगस्ट रोजी दाखल करण्यात आली होती.

नियुक्तीच्या ठिकाणीही त्यांना तातडीने हजर राहण्याचे आदेश

अधिकारक्षेत्राबाहेर जाऊन पदाचा दुरुपयोग केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली होती. चौकशीदरम्यान देवरे यांनी माध्यमांमध्ये भाष्य करुन शासनाची प्रतिमा मलिन केल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला आहे.दरम्यान, कर्तव्यात कसूर केल्याच्या कारणाने त्यांची बदली करण्यात आली असून जळगाव जिल्ह्यातील संगायो येथील तहसीलदारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तात्काळ प्रभावाने त्यांची बदली करण्यात आली असून नियुक्तीच्या ठिकाणीही त्यांना तातडीने हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय त्यांना कुठल्याही प्रकारची रजा मंजूर न करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ईडी चौकशी संदर्भातल्या वक्तव्यावरुन किरीट सोमय्या शरद पवारांवर संतापले

News Desk

ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न देता, मराठ्यांना आरक्षण !

News Desk

नूतन इमारतीच्या माध्यमातून ग्रामीण माणसाच्या अपेक्षांची पूर्ती व समाधान व्हावे! – धनंजय मुंडे

Aprna