HW News Marathi
महाराष्ट्र

शरद पवारांच्या बेळगाव दौऱ्याच्या आठवणीवरून सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारवर निशाणा

मुंबई | गेल्या काही दिवसांपूर्वीच कर्नाटचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील जत तालुक्यातील 40 गावासह सोलापूरमधील भागात दावा केला होता. यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्र-कर्नाटक सीमवाद पुन्हा एकदा सुरू झाला आहे.महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील आणि शूंभूराज देसाई हे आज (6 डिसेंबर) बेळगाव दौरा तुर्तास स्थगित केला असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या ऐंशीच्या दशकातील बेळगाव दौऱ्याची आठवण ट्वीटद्वारे ट्वीट उजाळा देत सत्ताधाऱ्यांवर टीका करत आहे.

या शरद पवारांनी बेळगावातील दौऱ्यादरम्यान झालेल्या आंदोलनात लाठ्या झेलल्यात. खुद्द एस. एम. जोशी देखील शरद पवारांच्या पाठीवर उमेटलेले वळ पाहून हळहळले होते. तो काळच तसा होते. यावेळी सीमाभागात कन्नड भाषेची सक्ती करण्यात येत होती. आणि कर्नाटक सरकारने शालेय अभ्यासक्रमात कन्नड अनिवार्य केल्याची घोषणा केली होती. या पाश्वभूमीवर शर पवारांनी आंदोलन केले होते, असे सुप्रिया सुळेंनी सांगितले.

सुप्रिया सुळेंनी आठवण शेअर करत म्हणाले

कर्नाटक-महाराष्ट्रादरम्यान पुन्हा एकदा सीमावाद सुरु झाला असताना महाराष्ट्रातील मंत्र्यांचा बेळगाव दौरा कर्नाटकच्या तंबीनंतर रद्द करण्यात आला. ही बातमी वाचली आणि मला शरद पवारांच्या ऐंशीच्या दशकातील आंदोलनाची आठवण झाली. शरद पवारांनी कर्नाटक पोलीसांच्या लाठ्या झेलल्या पण माघार घेतली नाही. खुद्द एस. एम. जोशी देखील शरद पवारांच्या पाठीवर उमेटलेले वळ पाहून हळहळले होते. तो काळच तसा होता. सीमाभागात राहणाऱ्या जनतेवर कन्नड भाषेची सक्ती करण्यात येत होती. कर्नाटक सरकारने शालेय अभ्यासक्रमात कन्नड अनिवार्य केल्याची घोषणा केली. याविरोधात मोठे आंदोलन उभे करण्याचा निर्णय समितीने घेतला.
खुद्द एस एम जोशी यांनी १९८६ मध्ये आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. याअंतर्गत तीन दिवसांच्या साखळी आंदोलनाचे नियोजन केले. महाराष्ट्रातले नेते बेळगावमध्ये जावून भर चौकात निषेध नोंदवतील, असे ठरविले. अर्थातच याला कर्नाटक सरकारने विरोध केला आणि महाराष्ट्रातील नेत्यांना प्रवेशबंदी केली.
पहिल्या दिवशीच्या आंदोलनाचे नेतृत्व पवारांकडे होते.बेळगावात दाखल होण्यासाठी पारवांनी एक शक्कल लढविली. ते कोल्हापुरात गेले. तिथून एक फियाट गाडी घेतली. सोबत बाबासाहेब कुपेकर आणि एक ड्रायव्हर घेतला. पवारांनी स्वतः ड्रायव्हर असल्याची बतावणी केली. खऱ्या ड्रायव्हरला मागे मालकाच्या जागी बसवले. तिघे जण निघाले. चेकपोस्टवर पोलिसांनी चौकशी केली परंतु त्यांना काहीच कळले नाही.साहेब बेळगावात पोहोचले पण कुणालाही थांगपत्ता लागला नव्हता.
बेळगावात जमावबंदी होती. पवारांनी पूर्वीच पोहोचले असल्यामुळे अरविंद गोगटेंच्या घरी त्यांनी मुक्काम केला.आंदोलनाची वेळ झाली. बरोबर ११ वाजता राणी चेन्नमा चौकात लोक जमू लागले. अचानकपणे हजारो लोक जमल्याने पोलिस गोंधळले. संतप्त पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. पवार, बाबासाहेब कुपेकर, आदींना पोलिसांनी बेदम मारहाण केली.
पवारांना  साहेबांना हिडकल डॅमच्या परिसरातील विश्रामगृहावर आणण्यात आलं. तेथेही लोक जमा झाले. वयस्कर एस एम जोशी साहेबांना भेटायला गेले. त्यांनी त्यावेळी साहेबांच्या पाठीवरील पोलिसांनी मारहाण केलेले वळ पाहिले. ते पाहून एसएम हळहळले होते. हा भारावलेला काळ कुठे आणि आजचा काळ कुठे? सारंच ३६० अंशात बदललंय.

Related posts

तुकाराम मुंढेचा पहिल्याच दिवशी धक्का

News Desk

कोरोना संसर्गविरोधात कोथरूडमध्ये निर्जंतुकीकरणचा चंद्रकांत पाटील यांचा उपक्रम

swarit

राजभवन मुंबई येथील नव्या दरबार सभागृहाचे राष्ट्रपतींच्या हस्ते उद्‌घाटन

News Desk