HW News Marathi
महाराष्ट्र

साकीनाका बलात्कार पीडितेच्या कुटुंबियांसाठी सरकारकडून २० लाखांची मदत जाहीर!

मुंबई। मुंबईत सुन्न करणारी घटना गेल्या आठवड्यात साकीनाका परिसरात घडली. एका ३४ वर्षीय महिलेवर टेम्पोचालकाने अमानुष लैंगिक अत्याचार केले. या महिलेचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. अंधेरी साकीनाका परिसरात राहणारा आरोपी मोहन चौहान याने पीडितेवर केलेल्या लैंगिक अत्याचारांमुळे संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घेत या प्रकरणातील तपासाबाबत माहिती दिली आहे.

गुन्हासाठी वापरण्यात आलेलं हत्यार सुद्धा जप्त करण्यात आलं आहे

पीडित महिला ही विशिष्ट समाजाची असल्याने अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने तपास सुरु आहे. आरोपीने आपला गुन्हा कबुल केला आहे आणि त्याने गुन्हाच्या संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे. घटनास्थळावर गुन्हा कसा घडला या घटनाक्रमातून सर्व पुरावे मिळाले आहेत. आरोपीकडून गुन्हासाठी वापरण्यात आलेलं हत्यार सुद्धा जप्त करण्यात आलं आहे,” असे हेमंत नगराळे यांनी सांगितलं.

पीडितेच्या मुलींना २० लाखांची मदत जाहीर करण्यात आली

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आहे. सोमवारी मुख्यमंत्री आणि इतर अधिकाऱ्यांसोबत वर्षा निवासस्थानी बैठक झाली. मुख्यमंत्र्यांनी पीडित महिलेच्या कुटुंबियांसाठी शासकीय योजना जाहीर केली आली आहे. मुख्यमंत्री निधीतून आणि शासकीय योजनांमधून पीडितेच्या मुलींना २० लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे,” असे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी सांगितले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अखेर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे निलंबन

News Desk

तहसीलदार ज्योती देवरे प्रकरणी फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र!

News Desk

पोलिसांचे कुटुंबीय पोहोचले कृष्णकुंजवर, राज ठाकरे म्हणाले…..

News Desk