मुंबई | नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित परिसरात गटारीत निळ्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पुरुष मृतदेहाचे तुकडे आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. संबंधित मृतदेह हा 30 ते 35 वयाच्या व्यक्तीचे असल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत मृतदेह वाशी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
संबंधित मृतदेह नेमका कुणाचा आहे?
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह वाशी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. संबंधित मृतदेह नेमका कुणाचा आहे? याचा तपास पोलीस करत आहेत. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी एपीएमसी पोलीस डॉग स्कॉड यांच्याकडून तपास करण्यात येतोय. पोलीस अनेक बाजूंनी तपास करत आहेत. तसेच परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत का? त्याचीदेखील शहानिशा पोलीस करत आहेत.एपीएमसी परिसरात गटारीत असलेल्या एका निळ्या पिशवीत सकाळपासून दुर्गंध येत होता. सुरुवातीला ये-जा करणाऱ्या नागरिकांनी दुर्लक्ष केलं. मात्र, हा दुर्गंध नकोसा झाल्यानंतर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होतं पिशवी उघडली. त्यावेळी संबंधित निळ्या पिशवीत पुरुष मृतदेहाचे तुकडे आढळले. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
दुसरीकडे धुळ्यातही अशीच काहिशी घटना समोर आली आहे. धुळ्यात एका 80 वर्षीय आजीचा मृतदेह एका गटातील कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या आजी गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होत्या. त्यांचे कुटुंबिय गेल्या दोन दिवसांपासून त्यांचा शोध घेत होते. त्यानंतर आजीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने परिसरातील नागरिकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. स्थानिक नागरिकांना मृतदेह दिसल्यानंतर याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात संबंधित मृतदेह हा 80 वर्षीय आजी कस्तुराबाई वानखेडे यांचा असल्याची माहिती समोर आली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.