मुंबई। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर थेट हल्ला केला आहे. उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका शिवसेना स्वबळावर लढवण्याची घोषणा त्यांनी केली आहे. मात्र भविष्यात युती होण्याचे संकेत पक्षाने दिलेत. यासंदर्भातील एक पत्रकच शिवसेनेचे उत्तर प्रदेशचे प्रभारी विश्वजीत सिंह यांनी जारी केलं आहे. मात्र आता याच विषयावरुन भाजपा नेते किरीट सोमय्यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.
उद्धव ठाकरेंना शिवसेनेच्या इज्जतीचा लिलाव करण्याची हौस
किरीट सोमय्या पत्रकार परिषद घेतली आणि यात ते बोलत होते. उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीत सर्व जागा लढवणार असल्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना सोमय्या यांनी या सर्व घोषणा राज्यातील घडामोडींवरुन लक्ष्य विचलीत करण्यासाठी केल्या जात असल्याचा दावा केला. यापूर्वी बिहारमध्ये निवडणूक लढवताना शिवसेनेच्या उमेदवारांचं डिपॉझीट जप्त होण्याबरोबरच काही उमेदवारांना १०० मतंही पडली नव्हती असा टोला सोमय्या यांनी लगावला. तसेच पुढे हसत त्यांनी, “उद्धव ठाकरेंना शिवसेनेच्या इज्जतीचा लिलाव करण्याची हौस आहे. त्यासाठी त्यांना शुभेच्छा,” असंही म्हटलं आहे.
काय आहे प्रकरण?
शिवसेनेच्या उत्तर प्रदेशमधील नेत्यांची नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीसंदर्भातील माहिती देणारं पत्रक जारी करतानाच या पत्रकामधून शिवसेनेनं उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकावर टीका केलीय. राज्यामध्ये शिक्षण, रोजगार, कायदा सुव्यवस्था यासारखे प्रश्न सध्या सत्तेत असणाऱ्या भाजपाच्या कार्यकाळात निर्माण झाल्याचं सांगतानाच भाजपाला धडा शिकवण्यासाठी सर्वच्या सर्व मतदारसंघांमधून शिवसेना उमेदवार देणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.
Shiv Sena to contest for all 403 seats in Uttar Pradesh Assembly elections in 2022. The party has not allied with any other political party as of now but has signaled the possibility of an alliance. pic.twitter.com/qqdZz6FQXH
— ANI (@ANI) September 11, 2021
१० सप्टेंबर रोजी लखनऊमधील हरतगंज येथे पक्षाच्या उत्तर प्रदेशमधील नेत्यांची बैठक पार पडली. आगामी विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना आणि पक्षाची वाटचाल कशी असणार यासंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा झाली. यावेळी उत्तर प्रदेशमधील शिवसेनेचे प्रमुख नेते ठाकूर अनिल सिंह यांनी उत्तर प्रदेश सरकारवर टीका करताना उत्तर प्रदेश सरकारमध्ये कायदा सुव्यवस्था सक्षम नसल्याची परिस्थिती आहे, अशी टीका केलीय. उत्तर प्रदेशमध्ये जंगलराज सुरु असून महिला आणि मुलींवर अत्याचार होत असल्याची टीका ठाकूर यांनी केली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.