मुंबई। भाजप नेते किरि सोमय्या सध्या महाविकास आघाडी सरकारच्या मागे हाथ धुऊन लागलेले दिसत आहेत. परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात आधी ईडी मध्ये तक्रार केली आणि आता त्यांच्या कार्यालय पडण्याची शक्यता आहे. लोकायुक्तांसमोर न्यायालयामध्ये ठाकरे सरकारनेच परब याच्या कार्यालयाचं बांधकाम अनधिकृत असल्याची माहिती दिल्याचा दावा भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केलाय. तसेच गांधी जयंतीच्या दिवशी परब यांच्या कार्यालयावर कारवाई सुरु केली जाणार असल्याचं सोमय्या यांनी म्हटलं आहे. वांद्रे येथील परब यांचे कार्यालय अनधिकृत असून त्यासंदर्भात लोकायुक्तांनीच बांधकाम पाडण्याचे आदेश दिल्याचं सोमय्या म्हणाले आहेत.
अनिल परब वापरत असलेले म्हाडा वांद्रे पूर्व येथील अनधिकृत कार्यालय पाडण्यात येणार
लोकायुक्त न्यायमूर्ती व्ही एन कानडे यांनी भाजप नेते डॉ किरीट सोमैया यांचा याचिकेचा सुनावणी दरमियान हा आदेश दिला
म्हाडाने जून आणि जुलै 2019 मध्ये अनिल परब यांना नोटीस बजावली होती @Dev_Fadnavis pic.twitter.com/UIzDfW9SLG
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) September 12, 2021
“जून २०१९, जुलै २०१९ मध्ये प्रक्रिया पूर्ण झाली. बेकायदेशीर बांधकाम तोडण्याचं आदेश दिलेत. मात्र नंतर पावसाळा सुरु झाल्याने बांधकाम तोडणं थांबवण्यात आलं आणि नंतर मंत्री झाल्यानंतर परबांनी महाडावर दबाव आणला,” असं सोमय्या म्हणालेत. तसेच पुढे बोलताना उद्धव ठाकरेंचा उजवा हात असणाऱ्या मिलिंद नार्वेकरांना बंगला तोडावा लागला आणि आता डावा हात असणाऱ्या परबांच्या कार्यालयावर कारवाई होणार आहे, असंही सोमय्या म्हणाले. तसेच २ ऑक्टोबरपासून हे कार्यालय तोडण्याची प्रक्रिया सुरु होणार असल्याचंही सोमय्या यांनी सांगितलं आहे.
अनिल परब यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी होणारच
गेल्या काही दिवसांपूर्वीच परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीची नोटीस मिळाली आहे. आणि आता परिवहन मंत्री अनिल परब यांचे दापोलीतील दोन रिसॉर्ट अनिधिकृत आहेत. त्यापैकी एकावर कारवाई करण्याचे आणि परब यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, परब मंत्री असल्याने त्यावर कारवाई होत नाही, असा आरोप करतानाच परब यांची आज ना उद्या मंत्रिमंडळातून हकालपट्टी तर होणारच आहे. पण त्यांच्यावर फौजदारी आणि दिवाणी गुन्हेही दाखल होणार आहेत. त्याशिवाय भाजप स्वस्थ बसणार नाही, असा इशारा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिला. संचयनी ग्रुपकडून अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक झाली आहे. या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या आणि आमदार नितेश राणे यांनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यावर चर्चा केली. त्यानंतर सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील विविध घोटाळ्यांवर भाष्य केलं.
केंद्राच्या टीमने राज्य सरकारने सांगितलं होतं
उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिंडळातील मंत्री अनिल परब यांनी दापोली समुद्र किनाऱ्यावर दोन अनधिकृत रिसॉर्ट बांधले आहेत. त्याची चौकशी झाली आहे. त्यावर कारवाई करण्याचा निर्णय झाला आहे. त्यातील एका रिसोर्टचं नाव साई रिसोर्ट अॅनेक्स असं आहे. तर दुसऱ्याचं नाव सी-कॉन्च रिसोर्ट असं असून हा रिसॉर्ट आपल्या मालकीचा असल्याचं लपवण्याचा परब यांचा प्रयत्न आहे. हे दोन्ही रिसोर्ट अनधिकृत असल्याचं केंद्राच्या टीमने राज्य सरकारने सांगितलं होतं. दोन्ही रिसोर्टमध्ये सीआरझेडचा भंग झाला आहे. पण सरकारने केवळ साई रिसोर्ट तोडण्याचा आदेश दिला आहे. दुसरा रिसोर्ट वाचवण्याचं पाप आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी केलं आहे. पण आम्ही या रिसोर्टवर कारवाई करायला लावूच, असा दावा सोमय्या यांनी केला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.