HW News Marathi
देश / विदेश

करावे तसे भरावे !, ED च्या कारवाईनंतर नारायण राणेंनी हाणला टोला

मुंबई । १०० कोटीच्या वसुली प्रकरणानंतर माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या घरी आज ईडीने छापेमारी केली आहे. यावरून विरोधी पक्ष आणि राज्य सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. या सगळ्या प्रकरणाला भाजप जबाबदार असल्याचे आरोप राष्ट्रवादीकडून केले जात आहे. राष्ट्रवादीच्या या आरोपांवर भाजपचे नेते आणि आमदार नारायण राणे यांनी राष्ट्रवादीला प्रत्युत्तर दिलं आहे.

ईडीची कारवाई ही राजकीय कारवाई नाही त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने तर यावर राजकारण करूच नये, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे. नारायण राणे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. करावे तसे भरावे या प्रमाणे आता भरण्याची वेळ आली असल्याचं नारायण राणे म्हणाले.

तसेच जे काही गुन्हे घडले आणि अटक झालेल्या लोकांनी जी काही माहिती दिली त्या आधारांवर ही सगळी चौकशी सुरू आहे. हे आरोप सिद्ध झाले की मग बघूया असंही राणे म्हणाले आहेत. याच मुद्यावरून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी काही दिवसांनी अनिल देशमुख यांची रवानगी जेलमध्ये होणार असल्याचं म्हटलं होतं. त्याचप्रमाणे अनिल परब आणि मिलिंद नार्वेकर यांचीही सीबीआय चौकशी करण्याची मागणी सोमय्या यांनी केली आहे. अनिल देशमुख यांच्याप्रमाणेच अनिल परब यांची अवस्था होणार असल्याचं देखील म्हटलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मायावतीची नवी राजकीय खेळी, काँग्रेस अडचणीत 

swarit

BiharElection |  महागठबंधनला मागे टाकत भापजची मोठी उडी 

News Desk

ज्ञानवापी प्रकरणावर 22 सप्टेंबरला पुढील सुनावणी; वाराणसी जिल्हा न्यायालयाचा निर्णय

Aprna