HW News Marathi
महाराष्ट्र

“मंत्री झाले राजे आणि प्रत्येक विभागात एक-एक वाझे” फडणवीसांची खोचक टीका

मुंबई। राज्यातील अनेक अश्या मुद्द्यांवरून विरोधी पक्ष भाजपने आवाज उठवला आहे. त्यासाठी पुर्ण वेळ अधिवेशन घेण्याची मागणी राज्य सरकारकडे केली. मात्र राज्य सरकारने दोन दिवसांचं अधिवेशन घेण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून भाजपने आता आक्रमक पवित्रा घेतला असून महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. अशातच विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी भाजप कार्यकारणी बैठकीत सरकारला धारेवर धरत खोचक अशी टीका केली आहे.

“पोलीस विभागातील वाझे तर सापडला मात्र अन्य विभागातील वाझेचा पत्ता आम्हाला लागला” म्हणून पावसाळी अधिवेशन दोन दिवसाचं करण्याचा निर्णय या सरकारने घेतला असल्याचं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी सरकारवर टीका केली आहे. त्यासोबतच “मंत्री झाले राजे आणि प्रत्येक विभागात एक-एक वाझे”, असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्राच्या इतिहासातील ठाकरे सरकार हे भ्रष्टाचार, अनाचार, दुराचार, अत्याचाराने बरबटलेलं आहे. कोणत्याही सरकारमध्ये १ मुख्यमंत्री असतो मात्र या सरकारमध्ये प्रत्येक मंत्री स्वत:ला मुख्यमंत्री समजत आहे. एखादा निर्णय घेतला जातो मात्र काही तासाभरात तो रद्द होतो आणि दुसऱ्यादिवशी नवीन निर्णय घेतला जातो. सरकार आहे की सर्कस, अशा शब्दात फडणवीसांनी सरकारवर टीका केली आहे. यावेळी बोलताना कोरोनाच्या मॉडेलवरूनही फडणवीसांनी निशाणा साधला.

दरम्यान, महाराष्ट्रात देशातले ३३ टक्के मृत्यू झाले आहेत. ऑक्सिजन मिळाला नाही म्हणून अनेकांना आपला प्राण गमवाव लागला. जे या सरकारची पाठ थोपटतात त्यांना विचारावं वाटतं की तुुमचं डोक ठिकाणावर आहे का, असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नीरा-देवघर प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता; माढा लोकसभा मतदारसंघासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अनेक निर्णय

Aprna

टिव्हीच्या नेटवर्क मध्ये राहणाऱ्यांना जनतेचे नेटवर्क काय कळणार? अजितदादा भाजपवर भडकले

News Desk

अनिल देशमुखांना आणखी एक धक्का! मुलगा ऋषिकेश देशमुखांना ED चं समन्स 

News Desk