मुंबई। मुंबईच्या साकीनाका परिसरात महिलेवर बलात्कार करुन आरोपीने गुप्तांगात रॉड घुसवल्याचा अमानवीय प्रकार समोर आला होता. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात केलं होते. मात्र बलात्कार घटनेतील पीडितेचा आज उपचारांदरम्यान मृत्यू झाला. अत्यंत पाशवी अशा या घटनेवर आता सर्वच स्तरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीदेखील या प्रकरणाबाबत संताप व्यक्त करत अशा नराधामांना सार्वजनिकरित्या फाशी द्यायला हवी असे म्हटले आहे.
महिलेचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला
साकीनाका येथील खैरानी रोड परिसरातील या घटनेमुळे खळबळ माजली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला ३२ वर्षांची आहे.पहाटे साडे तीन वाजण्याच्या सुमारास कंट्रोल रुमला साकीनाका येथे खैराना रोडवर एक महिला रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत पडली असल्याचा फोन आला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त आणि अतिरिक्त पोलीस आयुक्तांनी घटनास्थळी धाव घेत पीडितेला घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र या महिलेचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे.
असे गुन्हेगार जिवंत का आहेत?
साकिनाका येथील बलात्कार पीडितेचा जखमांमुळे मृत्यू झाला आहे. बलात्कार करणाऱ्याने दिल्लीतील निर्भया प्रकरणाप्रमाणे तिच्या खाजगी भागात रॉड घातला होता. असे गुन्हेगार जिवंत का आहेत? ते आमच्या मुलींसाठी धोका आहेत. मला ठामपणे वाटते की या नराधामांना सार्वजनिकरित्या फाशी द्यावी!,” असे अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे.
Sakinaka alleged rape victim succumbs to her injuries-rapist had inserted rod in her private parts like Nirbhaya case in Delhi.
Why are such criminals alive- they are a threat to our own daughters- I strongly feel these demons should be executed in public !#MumbaiRape #sakinaka— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) September 11, 2021
दरम्यान, या प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. साकीनाक्यात घडलेला प्रकार आणि त्यानंतर पीडितेचा मृत्यू मन सुन्न करणारा आहे. गेल्या महिन्याभराच्या काळात बलात्काराच्या घटना होत आहेत. याकडे लक्ष देण्याची गरज आहे असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. तसेच, या घटना मुंबईत असुरक्षिततेची भावना निर्माण करणाऱ्या असल्याचं देखील ते म्हणाले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.