HW News Marathi
महाराष्ट्र

‘येड्याची जत्रा आणि खुळ्यांची चावडी’, गोपीचंद पडळकरांचा विजय वडेट्टीवारांवर हल्ला

सांगली। भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे सध्या राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर टीका करताना दिसत आहेत. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आता राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर महाज्योती संस्थेतील कारभारावरून निशाणा साधला आहे. वडेट्टीवार यांनी महाज्योती संस्थेची येड्याची जत्रा आणि खुळ्यांची चावडी केली आहे, अशी खोचक टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

‘येड्याची जत्रा अन खुळ्याची चावडी’

गोपीचंद पडळकर यांनी ट्विट करत वडेट्टीवारांवर टीका केली आहे. “अतिसन्माननीय मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रस्थापितांना मुजरा करत महाराष्ट्रातील ओबीसी भटक्या जाती जमाती, यांचा छळ करण्याचा जणू काही विधाच उचलला आहे. याच मालिकेमध्ये MPSC आणि UPSC विद्यार्थ्यांच्या भविष्याचा कडेलोट करायचा त्यांनी ठरवलं आहे. काल कुठलीही पुर्वसूचना न देता 13 सप्टेंबरला अचानकपणे UPSC चाळणी परीक्षेचे आयोजन केले आहे. आता तीन दिवसात विद्यार्थी येणार कधी? परीक्षा देणार कधी? UPSC चे उमेदवार दिल्ली येथे तयारी करण्यासाठी गेलेले असतात. काहींची 10 ऑक्टोबरला पूर्व परीक्षा आहे, तर काहींच्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुलाखती आहेत”, असं त्यांनी सांगितलं आहे.

आंदोलन करण्याशिवाय आमच्यकडे पर्याय नाही

गोपीचंद पडळकर यांनी सरकारला इशारा दिला आहे. सरकारविरोधात आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. चाळणी परीक्षा तुम्ही विद्यार्थ्यांशी चर्चा करून पुर्ननियोजीत केली नाहीतर आंदोलनाशिवाय पर्याय उरणार नाही. तसा माझा या प्रस्थापित सरकारला इशाराच आहे, असं त्यांनी सांगितलं आहे.

नाही सांगितलं तर मी अब्रुनुकसानीचा दावा करेन

विजय वडेट्टीवार यांनी अगदी संतापजनक प्रत्युत्तर गोपीचंद पडळकरांना दिलं आहे. “पडळकरांनी ऐकिव गोष्टीवर आरोप करू नये. वास्तव गोष्टींवर आरोप करावेत. आता ते कार्यकर्ते राहिले नाहीत. आमदार झाले आहेत. एखाद्या मंत्र्यावर जबाबदारीने आरोप केले पाहिजेत. माझी छत्तीसगडमध्ये फॅक्ट्री असल्याचा त्यांनी आरोप केला आहे. कोणत्या ठिकाणी ही फॅक्ट्री आहे हे त्यांनी सांगावं. पत्ता काढावा. कोणत्या नातेवाईकाची आहे हे सांगावं. नाही सांगितलं तर मी अब्रुनुकसानीचा दावा करेन. कोर्टात जाईल. माझी कोणत्याही दुकानात भागिदारी नाही. असेल तर पुराव्यानिशी सिद्ध करावी”, असं वडेट्टीवार म्हणाले आहेत.

पडळकर खऱ्या बापाची औलाद असेल तर…

पडळकर यांनी माझ्यावर केलेले आरोप सिद्ध करावे, पुरावे द्यावे, आरोप सिद्ध झाले तर मी राजकारण सोडेल. माझ्या नावाने, माझ्या नातेवाईकांच्या नावे कुठलंही दारुचे दुकानं नाही. छत्तीसगडमध्ये कंपनी नाही. पडळकर खऱ्या बापाची औलाद असेल तर, तर त्यांनी आरोप सिद्ध करावे, असं आव्हानच त्यांनी दिलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लोकप्रिय ठरले, त्यांना पंतप्रधान करा’, पृथ्वीराज चव्हाण

News Desk

शेतकरी कर्जमाफीसाठी विरोधी पक्ष रस्त्यावर उतरणार!

News Desk

सारथी संस्था बंद करण्याचे षडयंत्र !

swarit