HW News Marathi
महाराष्ट्र

नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणासाठी पालिका मुख्यालयासमोर धडकणार आंदोलक!

नवी मुंबई | नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी आज निघणाऱ्या मोर्चाला पोलीसांनी पामबीच मार्गावर पालिका मुख्यालयासमोरील जागा दिली आहे. त्यामुळे पामबीच मार्गावर नेरुळ ते. बेलापूर दरम्यान आंदोलक जमणार आहेत. यासाठी पामबीच मार्गावरील वाहतुकीत देखील बदल करण्यात आले आहेत.

आज (२४ जून) नेरुळ ते बेलापूर दरम्यानचा पामबीच मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवला जाणार आहे. नेरुळ येथून केवळ आंदोलकांच्या गाड्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. ही वाहने करावे गावापर्यंत जाऊ शकणार असून त्याठिकाणी त्यांच्या पार्किंगची व्यवस्था आंदोलनाच्या संयोजकांमार्फत करण्यात आलेली आहे. तर पामबीच मार्गे जाणारी इतर खासगी वाहने नेरुळ येथून राजीव गांधी पूल मार्गे एल. पी. पुलाकडे वळवली जाणार आहेत.

या आंदोलनात नवी मुंबईसह पनवेल, उरण, कल्याण डोंबिवली, पालघर आदी परिसरातून 50 हजाराहून अधिक आंदोलक सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यांच्या वाहनांमुळे आज नवी मुंबईत जागोजागी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आवश्यक ठिकाणी वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त देखील नेमण्यात आला आहे.पालिका मुख्यालयासमोर धडकणार आंदोलक

वाहतुकीसाठी कोणते रस्ते असणार खुले?

पोलिसांनी बेलापूरच्या सिडको मुख्यालयाकडे येणारे सीबीडी महालक्ष्मी चौक, बेलापूर किल्ला, पार्क हॉटेल, पालिकेचे जुने मुख्यालय या चार मार्गांनी येणारे सर्व रस्ते अत्यावश्यक वाहनांव्यतिरिक्त सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद केले आहेत.

मुंबईहून पुणे-गोव्याकडे जाणाऱ्या वाहतुकीला ऐरोली, शिळफाटा मार्गे कळंबोलीला जावे लागणार असून त्यानंतर ही वाहने पुणे- गोव्याकडे जाऊ शकणार आहेत. तर पुण्याहून येणाऱ्या वाहनांना तळोजा येथील पुरुषार्थ पेट्रोलपंपापासून वळण घेऊन शिळफाटा मार्गे मुंबईत जावे लागणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केंद्राला काय करायचं ते करू द्या, शेतकऱ्यांच्या हिताला धक्का लागू देणार नाही!

News Desk

रेल्वेचे आरक्षणासाठी पोस्टपेड पर्याय

News Desk

सर्व घटकांना न्याय, शेतकरी व महिलाशक्तीचा गौरव करणार सर्वसमावेशक अर्थसंकल्प! – उपमुख्यमंत्री

Aprna