HW News Marathi
महाराष्ट्र

राष्ट्रवादीतील प्रस्थापितांना डावलून जयंत पाटलांच्या नातेवाईकांना मोठं पद

अहमदनगर। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची अहमदनगर जिल्ह्यावर चांगलीच करडी नजर असल्याचं दिसतंय. नगर या जिल्ह्यातील राहुरी मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार आणि जयंत पाटलांचे भाचे प्राजक्त तनपुरे यांना मंत्रिपद दिलं आहे. अर्थातच त्यांच्या आणखी एका नातेवाईकाला मोठं पद देण्यात आलं आहे. नगर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे अनेक निष्ठावंत असून त्यांचं पक्षासाठी मोठं योगदान आहे. अशांना बाजूला ठेवत आपल्या नातेवाईकांना मोठं पद देत त्यांची वर्णी लावलीये.

लाखोंपेक्षा अधिक भाविकांचे श्रद्धास्थान असलेले शिर्डीतील साईबाबा आणि पंढरपुरमधील विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थानच्या विश्वस्तपदावर वर्णी लागण्यासाठी राजकीय मंडळींकडून प्रयत्न सुरू होते. यामध्ये साई संस्थान, पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी संस्थान विश्वस्तपदाबाबत निर्णय घेण्यात आला. नगर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे अनेक निष्ठावंत आहेत मात्र त्यांना डावलून मात्र शिवसेनेतून राष्ट्रवादीत आलेल्या आशुतोष काळेंना हे पद देण्यात आलं आहे.

जयंत पाटील यांच्या दोन्ही बहिणी नगर जिल्ह्यात आहे. माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या पत्नी उषा तनपुरे आणि माजी आमदार नरेंद्र घुले यांच्या पत्नी नीलिमा घुले या जयंत पाटलांच्या बहिणी आहेत. नरेंद्र घुले हे चंद्रशेखर घुले यांचे भाऊ आहेत. चंद्रशेखर यांची मुलगी चैताली या आशुतोष काळे यांच्या पत्नी आहेत.

म्हणुनच शिर्डी साईबाबा संस्थान अध्यक्षपद राष्ट्रवादीला तर विठ्ठल रुक्मिणी देवस्थान पंढरपूर काँग्रेसच्या पारड्यात गेलं. आशुतोष काळे यांच्याकडे शिर्डी साई संस्थानचं अध्यक्षपद देण्यात आलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रातील 10 विधान परिषदेच्या जागांसाठी 20 जूनला निवडणूक

Aprna

परत जायचंच होतं तर आलात कशाला पुणेकरांनी बोलवालंही नव्हतं, पवारांचा पाटलांना सणसणीत टोला

News Desk

सचिन वाझेंचा NIA कोर्टात जामिनासाठी अर्ज

News Desk