HW News Marathi
महाराष्ट्र

‘अंजली दमानिया यांनी खुशाल हायकोर्टात जावं’ – छगन भुजबळ

नाशिक। राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना दिल्लीतील कथित महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात मुंबईतील सत्र न्यायालयाने दिलासा दिला आहे. भुजबळ यांना न्यायालयाकडून क्लीन चीट मिळाल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आपण याप्रकरणी हायकोर्टात जाऊ, असा इशारा दिला आहे. त्यांच्या याच भूमिकेवर भुजबळ यांना प्रश्न विचारला असता त्यांनी दमानिया यांनी खुशाल हायकोर्टात जावं, कसं भुजबळांकडून सांगण्यात आले.

भुजबळांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांशी संवाद साधला

छगन भुजबळ आज सायंकाळी नाशिकमध्ये दाखल झाले. यावेळी ढोल ताशे वाजवत आणि फटाके फोडून भुजबळांचं जंगी स्वागत करण्यात आलं. भुजबळांच्या स्वागतासाठी नाशिकमध्ये प्रचंड गर्दी जमली होती. यावेळी कार्यकर्त्यांनी पेढे भरवत, ढोलाच्या तालावर ठेकाही धरला. महिलांनी भुजबळांचं औक्षण केलं तर कार्यकर्त्यांनी त्यांना भला मोठा हार घातला. त्यानंतर भुजबळांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. याचवेळी त्यांना अंजली दमानिया यांच्या भूमिकेवर प्रश्न विचारण्यात आला.

“मेरे खिलाफ होनेवाली बातो को मैं अक्सर खमोशी से सूनता हुँ…

राजकारणात शब्दाने शब्दाला उत्तर दिलं जातं आणि विचाराने विचाराला. परंतु, हल्लीच्या काळाज अडचणीत टाकण्याचा प्रकार सुरू झाला आहे. आता तर अधिकच अडचणीत टाकलं. त्यातूनच बाहेर वाकप्रचार सुरू झाला तुम्ही सरळ वागता की तुमचा भुजबळ करू. आता त्यांना तो वाकप्रचार वापरता येणार नाही. दुसरं काही तरी शोधावं लागेल, असा चिमटा त्यांनी काढला.“लोकशाही आहे, त्यांनी खुशाल हायकोर्टात जावं. आम्ही अधिक उजळ माथ्याने समोर येऊ”, असं छगन भुजबळ यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी हिंदीतला एक शेरही म्हटला. “मेरे खिलाफ होनेवाली बातो को मैं अक्सर खमोशी से सूनता हुँ, जवाब देने का हक मैने वक्त को दे रखा है”, अशा शब्दात भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली.

जनतेचे आशीर्वाद, तुमच्या सर्वांचं प्रेम आणि तुमच्या सर्वांचं सहकार्य यामुळे शुभ दिनी शुभ निर्णय आले. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहेत. आनंद होणं साहजिकच आहे. चार पाचवर्ष सातत्याने जे आमच्यावर आरोप लावले जात होते. कार्यकर्ते आम्हाला काही म्हणत नव्हते. पण त्यांच्या मनातलं दु:ख कळत होतं. कार्यकर्त्यांचं मन कसं जळत असेल हे कळत होतं. आम्ही तुरुंगात असताना आम्हाला ते अधिक जाणवत होतं. आम्हाला जी अटक झाली त्यामुळे कार्यकर्त्यांना तोंड द्यावं लागेल. त्यांना खाली पाहावं लागेल ही दु:खाची भावना सातत्याने मनात होती, असं सांगताना ते भावूक झाले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सत्ता ही कुणाच्या बापाची जहागीरदारी नाही, वडेट्टीवारांचा नारायण राणेंना टोला!

News Desk

‘चोरी की है तो कबूल करना पडेगा’; अजित पवारांच्या निकटवर्तीयांवरील IT छाप्यानंतर सोमय्यांची प्रतिक्रिया

News Desk

राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतले ‘हे’ ७ महत्त्वाचे निर्णय

News Desk