HW News Marathi
महाराष्ट्र

गणेशोत्सवासाठी साकारलं गिरणगाव!

मुंबई | देशात आज(१० सप्टेंबर) सर्वत्र गणेशोत्सव सण साजरा केला जात आहे. लाडक्या बाप्पाचं जोशात स्वागत केलं जात आहे. गणपतीसाठी देखावा देखील महत्वाचा असतो. मुंबईच्या परळ येथे राहणाऱ्या पराग सावंत यांनी यंदा गणपतीसाठी साकारलेला देखावा चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे. या देखाव्यातून पराग सावंत यांनी जुनं लालबाग-परळ अर्थात गिरणगाव साकारले आहे. गेल्यावर्षी त्यांनी BDD चाळीचा देखावा साकारला होता. हा देखावा तेव्हा चर्चेचा विषय ठरला होता.

मुंबई उंचावरी । मलबार हिल इंद्रपुरी

आज गणपती उत्सव म्हटला की लोकांच्या समोर लालबाग – परळचा गणेश उत्सव आठवतो पण हाच ‘ लालबाग -परळ एकेकाळी ‘ गिरणगाव ‘ म्हणून ओळखले जात , ’ गिरणगाव ‘ म्हणजे गिरण्यांचे गाव’

मुंबईच्या आर्थिक राजधानीचा मान मिळाला तो याच गिरण्याच्या गिरणगावा मुळेच , आज लालबाग परळ ज्या गणेशउत्सवाने गजबजून जाते , त्या उत्सवाचा गाभा हा आकाशाला भिडलेल्या अनेक गिरण्या आहेत .

मुंबईत पहिली गिरणी सुरू झाली आणि महाराष्ट्रसह देशातील विविध भागातून लोकं आली सोबत आपली संस्कृती ,आपली भाषा , आपली परंपरा देखील घेऊन आले त्यातुनच या गिरणगावातील हा गणेशोत्सव जगाच्या पाठीवर आपली छाप सोडून आहे ,ईथल्या चाळसंस्कृतीत दडलेला गणेशोत्सव फार विशेष आहे .

लोकमान्य टिळकांनी केशवजी चाळीत गणेशउत्सवाचा पाया रचला खर तर त्याला कळस चढविला तो गिरणगावात राबणाऱ्या हातांनीच . गेल्या काही वर्षात गिरणगावाचा चेहरामोहराच बदलला गेला , इथल्या गिरण्यांची जागा टोलेजंग टॉवर आणि मॉल्सने घेतली ,तर काही गिरण्या अजुन इतिहासाची साक्ष देत उभ्या आहेत . आज जर याच गिरण्या चालू झाल्या तर , खितपत पडलेले उंच भोंगे सुरू झाले तर ? गिरण्याच्या आवारात शाहिराची शाहिरी टाल ऐकू आली तर ? त्याच कष्टकरी हाताने हा उत्सव आज कसा साजरा झाला असता , याचे मनोभावे रूप कसे असते हेच मांडण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न …

– पराग सावंत

राज्य सरकारचा नेमका निर्णय काय?

राज्य सरकारने गणेशोत्सवासाठी नवी नियमावली जारी केली आहे. नव्या नियमावलीनुसार भाविकांना मंडपात जाऊन बाप्पाचे दर्शन घेता येणार नाही. तर गणेश मंडळांनी बाप्पाच्या दर्शनाची ऑनालईन तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमातून सोय करुन द्यावी, असे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत.

राज्य सरकारने गणेशोत्सवासाठी नवी नियमावली जारी केली आहे. नव्या नियमावलीनुसार भाविकांना मंडपात जाऊन बाप्पाचे दर्शन घेता येणार नाही. तर गणेश मंडळांनी बाप्पाच्या दर्शनाची ऑनालईन तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमातून सोय करुन द्यावी, असे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

इतक्या लाटा आल्या तरीही शिवसैनिकांनी आपला बालेकिल्ला राखला !

News Desk

ब्रेकिंग: छगन भुजबळ यांच्या लढ्याला मोठे यश

Sanjay Jog

 डिएसकेंची मालमत्ता होणार जप्त, सरकारचा आदेश

News Desk