नवी दिल्ली | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी राष्ट्रमंचच्या बॅनरखाली विरोधी पक्ष नेत्यांची बैठक सुरु आहे. शरद पवार ३ दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर होते. यावेळी मोदी सरकार विरोधात रणनिती आखण्यासाठी ही बैठक घेतली जात आहे का अशीही चर्चा सुरु झाली आहे. यशवंत सिन्हा यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रमंचच्या बॅनरखाली विरोधी पक्षांचे नेते ६ जनपथ वर एकत्र आले आहेत. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, जेडीयूचे माजी खासदार पवन वर्मा, सपाचे घनश्याम तिवारी यांच्यासह जवळपास पंधरा नेत्यांची उपस्थिती आहे.
बैठकीला कोण उपस्थित
राजकारण्यांसह विविध क्षेत्रातील नामवंतांना या बैठकीत पाचारण करण्यात आलं आहे. या बैठकीला ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ केटीएस तुलसी, माजी मुख्य निवडणूक आयुक्त एसवाय कुरैशी, केसी सिंह, गीतकार जावेद अख्तर, प्रीतीश नंदी, ज्येष्ठ वकील कोलिन गोन्साल्वीज, करण थापर आणि आशुतोष या बैठकीत सामिल होणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे.
Delhi: CPI MP Binoy Viswam arrives at NCP chief Sharad Pawar's residence for a meeting of Opposition leaders
"It is a platform of all secular, democratic Left forces against a most hated govt that has failed. The country needs a change. The people are up for a change," he says pic.twitter.com/b2Ds1XQdT2
— ANI (@ANI) June 22, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.