HW News Marathi
महाराष्ट्र

उस्मानाबाद जिल्हयातील ५ वीच्या मुलीचं नाव गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये

उस्मानाबाद | जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील तेरखेडा इथल्या इयत्ता पाचवी वर्गात शिकणाऱ्या मुलींन योगासनाच्या गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव कोरल आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील तेरखेडा इथल्या कु.हिंदवी परमेश्वर चौरे या नऊ वर्षीय इयत्ता पाचवीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलींन योगासनाच्या बाबतीत गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपल्या योगाची नोंद करून गावाचं नाव योगाच्या बाबतीत वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्ये पोहोचवलं आहे.

हिंदवीला लहानपणापासून योगाची तिच्या आई-वडिलांकडून माहिती मिळाली, आवड निर्माण झाली. शाळेत तिला योगाचे धडे मिळाले त्यानंतर तिने सराव केला. शाळा स्तरीय स्पर्धेत तालुका आणि जिल्हा पातळीवर तीन योगाच्या परीक्षेत तिच्या शारीरिक अंगभूत गुणांमुळे योगाची कला आणि योगाचा सराव असल्यामुळे तिला चांगले गुण मिळाले. त्यानंतर तिच्या आई-वडिलांकडून तिला योगाचे धडे तसेच योगाचे पुस्तक वाचून निरालांबा पूर्ण चक्रासन या योगासनविषयी माहिती मिळाली आणि त्याचा तिने सराव केला.

साडेपाच मिनीटात निरालांबा पुर्ण चक्रासन या प्रकारचे शंभर चक्रासन करून गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये तिन स्वतःच नाव कोरलं. 25 मार्च 2021 ला तिचं नाव त्यात त्या वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याचे प्रमाणपत्र देखील तिला मिळाले असून या रेकॉर्ड नंतर आता तिने एशिया स्पर्धे पर्यंत मजल मारून भारतासाठी योग करण्याचा तसेच देशाचे योगाचे नेतृत्व करण्याचे ध्येय समोर असल्याचं सांगितलं आहे.

HW NEWS मराठी

प्रतिनिधी-उदय साबळे‌ पाटील

तेरखेडा/ उस्मानाबाद

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“‘लाव रे तो व्हिडिओ…’ च्या वादळी सभांमुळं”, रोहित पवारांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर

News Desk

महेश कोठेंची शिवसेनेतून हकालपट्टी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या आदेशानुसार कारवाई

News Desk

पुणे-कोल्हापूर बस चालकाला ह्रदयविकाराचा झटका

News Desk