HW News Marathi
महाराष्ट्र

बी एच आर मुळे हजारोंचे संसार उध्वस्त झाले ! एकनाथ खडसे

जळगाव । बीएचआरमधील अवसायक नियुक्ती नंतरच्या कोट्यावधींचा गैरव्यवहारात ज्यांना अटक झाली, त्यांनी कोटींचे कर्ज आणि ठेवींच्या पावत्या किरकोळ रक्कम परतावा करून ‘निल’ केल्याचा संशय घेतला जातोय. जळगावातल्या कोरोनाच्या पहिल्या थैमानानंतर प्रारंभिक अटक सत्र पार पडलं. आता कोरोना आटोक्यात येत असताना, दुसऱ्या टप्प्यातील अटक सत्राने राजकीय वर्तुळात आता उलट सुलट चर्चांना वेग आलाय.

कारवाई कशी झाली ?

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर जळगावचे जनजीवन पूर्ववत होऊन व्यावसायिक, उद्योजक, व्यापारी नव्या जोमाने कामाला लागले होते. मात्र काल (१७जूनला) सकाळी खान्देश सेंट्रल मॉलच्या हिरवळीत मॉर्निंग वॉक करताना संजय तोतला यांना वॉरंटचा कागद दाखवत घेऊन जाण्यात आले. तर दुसरीकडे दुसऱ्या पथकाने हॉटेल व्यवसायिक भागवत भंगाळे, जयश्री मणियार यांना ताब्यात घेतले. तर त्यापाठोपाठ इतर ठिकाणाहून पथकानं ताब्यात घेण्याचे काम केले.

भागवत भंगाळे, संजय तोतला, जयश्री मणियार यांना ताब्यात घेत त्यांच्या कुटुंबीयांना अटकेची नोटीस देत लागलीच जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून अटक केल्याची नोंद करण्यात आली. या संशयितांना अटक करत आहेस प्रत्येकाच्या घरी पुण्याच्या पोलीस सत्राने झडती सत्र राबवलं, तर भंगाळे यांच्या निवासस्थानावर तब्बल साडेपाच तास पथकाने झाडाझडती घेतली.

जळगावच्या तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांच्याकडे या सगळ्या गुन्ह्यांचा तपास असून, मागच्या वर्षी कंडारे, सुनील झंवर वगळता महाविर जैन, विवेक ठाकरे, सुरज झंवर, धरम सांखला आदींसह अटक करण्यात आली होती तर या संपूर्ण प्रकरणात धरम सांखला आणि त्या अगोदर सुनील झंवर यांचा मुलगा सुरज यांची जामिनावर सुटका झाली तर काही संशयितांनी सुटकेचा निश्वास सोडलेला असताना ही कारवाई झाल्याने एकच खळबळ उडाली.

एकनाथ खडसे काय म्हणाले ?

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे म्हणाले कि, कुणाचं नाव आहे यामध्ये हे काही मला माहिती नाही परंतु जे कोणी यामध्ये संबंधित असतील त्याची चौकशी होईल यामध्ये लहान असो की मोठा असो हा काही राजकीय विषय नाही याची चौकशी झाली पाहिजे बी एच आर घोटाळ्याबाबत मी प्रतिक्रिया दिली आहे बी एच आर मल्टीस्टेट सोसायटी मध्ये कोट्यावधीचा घोटाळा झाला या घोटाळ्याची चौकशी बीओडब्ल्यू कडून करण्यात यावी याची मागणी एडवोकेट किर्ती पाटील यांनी २०१८ लाच केली होती मधल्या कालखंडामध्ये चौकशी ला वेग घेऊ शकला नाही आता अनेक गोष्टी समोर यायला लागले आहेत शेकडो ठेवीदारांच्या ठेवी काही लोकांनी नाममात्र दरामध्ये घेतल्या काही ठिकाणी तर बनावट कागदपत्रांचा वापर केला गेला आहे काही ठिकाणी तारण नाही ठेवलेले नसताना कर्ज घेतलं गेलं आणि ठिकाणी पात्रता नसतानाही 5 कोटीचे कर्ज दिलं गेलं आणि ते वसूल झालेला आहे असे अनेक आरोप त्याठिकाणी आहेत हा राजकीय विषय नसून ठेवीदारांच्या सुरक्षित संरक्षणाचा विषय हजारो ठेवीदारांचा पैसा या ठिकाणी उद्वस्त झालेले आहे संसार त्यामुळे उद्ध्वस्त झालेले आहेत अशी प्रतिक्रिया विचार घोटाळाप्रकरणी एकनाथ खडसे यांनी दिली आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठीचा आग्रह धरल्याने सराफाची लेखिका शोभा देशपांडेंशी गैरवर्तणूक, देशपांडेंचे ज्वेलर्स बाहेर आंदोलन

News Desk

“…नाहीतर भागवत कराडांच्या शपथविधीला गेले असतेच”, पंकजा मुंडेंचं विधान

News Desk

राष्ट्रवादी आमदाराच्या वडिलांना ‘कृषीरत्न पुरस्कार’ जाहीर, मुलाने ‘असं’ केलं अभिनंदन

News Desk