HW News Marathi
देश / विदेश

‘शिवसेना सर्टिफाईड गुंडा पार्टी’ राऊतांच्या वक्तव्यावर अजित पवार म्हणतात…

मुंबई। शिवसेना-भाजप यांच्यात शिवसेना भवनासमोरचं राडा झाला यावेळी ‘शिवसेना सर्टिफाईड गुंडा पार्टी’ आहे असे संजय राऊत म्हणाले होते. कोणाची युती-आघाडी कोणाबरोबर अशी कोणी चर्चा करत असलं तरी सरकारचं कामकाज व्यवस्थित चालू आहे,असं अजित पवार म्हणाले, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेना सर्टिफाईड गुंडा पार्टी असल्याचं म्हटलं होतं, तर यावर अजित पवारांनी आपली भूमिका मांडली आहे. कोणी काहीही बोलतं, कुठलाही पक्ष स्वतः गुंड म्हणून घेणार नाही. आज राज्याचे प्रमुख शिवसेनेचे नेते आहेत. कायद्याने राज्य चालवणं, नियमाने काम चालवणं, सगळ्यांना सोबत घेऊन काम करणं असं काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करतायेत.

सरकार मजबूत आहे !

महाराष्ट्रात कोणी कोणाबरोबर चर्चा करत असलं तरीदेखील सरकार हे सुरळीत पणे व्यवस्थित चालू आहे, प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा नैतिक अधिकार आहेच. आणि हे लोकशाहीचे लक्षण आहे. सध्या कोणतेही प्रकारच्या निवडणुका नसल्यामुळे या गोष्टी करण्यात किंवा यावर चर्चा करण्यात कुठलाच अर्थ नाहीये. सध्या आपल्या महाराष्ट्र राज्यावर कोरोनाचा बिकट सावट आहे. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे पाऊस पडतोय शेतकऱ्यांना खतं, बियाणे कसे मिळतील यावर सरकारचं लक्ष आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

संजय राऊत काय म्हणाले होते ?

शिवसेना गुंडगिरी करते पण शिवसेनेला सत्तेचा माज नाही. काल जर सत्तेचा माज दाखवत राडा झाला असता. तर परिस्थिती वेगळी दिसली असती. गुंडगिरी म्हणत असाल तर कुणी शिवसेना भवनावर मराठी माणसाच्या अस्मितेचं प्रतीक असलेल्या, हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी या सदनात बसून राज्याचा कारभार हाकला, त्या वास्तुच्या दिशेने कोणी चाल करत असेल तर होय, आम्ही गुंड आहोत. हे सांगण्यासाठी आम्हाला कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही. महाराष्ट्राच्या, हिंदुत्वाच्या बाबतीत आम्ही सर्टिफाईड गुंड आहोत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान यावर्षीही जवानांसोबत दिवाळी साजरी करणार

News Desk

यमुना एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात, २९ जणांचा मृत्यू

News Desk

भारत- चीनचे सैन्य भिडले

News Desk