HW News Marathi
व्हिडीओ

तृणमुलच्या खासदार नुसरत जहाँ वादात का सापडल्या ?

अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ या गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या वैयक्तिक कारणांमुळे बऱ्याच चर्चेत आहेत. ट्विटर वर आज त्या ट्रेडींग मध्ये आहेत .ह्या दिवसांत उलटसुलट चर्चा आणि अनेक तर्क-वितर्कांना देखील उधाण आले होते. नुसरत या ६ महिन्यांच्या गर्भवती आहेत. तसेच नुसरत यांचा पती निखिल जैनला याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे म्हटले जात आहे. नुसरत आणि निखिल यांच्या वैवाहिक आयुष्यात वाद सुरु असल्याचे देखील म्हटले जात आहे. गेल्या ६ महिन्यांपासून ते दोघे वेगळे राहत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आपल्या आयुष्यातील अत्यंत वैयक्तिक गोष्टींबाबत उघडपणे अशी चर्चा आणि उलटसुलट तर्क लावले गेल्यानंतर मात्र आता अखेर खुद्द नुसरत जहाँ यांनीच या प्रकरणावर खुलासा केला आहे. यासाठी नुसरत जहाँ यांनी चक्क ७ मुद्द्यांवर स्पष्टीकरण देणारं जाहीर निवेदनच काढलं आहे. या ७ मुद्द्यांच्या आधारे केलेल्या स्पष्टीकरणामध्ये नुसरत जहाँ यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर दावे केले आहेत.

#NusratJahan #TMC #MP #TrinamoolCongress #MahuaMoitra #MamataBanerjee #WestBengal

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Pankaja Munde यांनी घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना खडसावलं! Bhagwat Karad यात्रेत राडा

News Desk

घोटाळ्याच्या मुद्द्यावरून Somaiya आणि Raut पुन्हा एकदा आमने-सामने

News Desk

Raj Thackeray यांना चैत्यभूमीवर बोलावण्याचं माझं वक्तव्य नाही; Sujat Ambedkar यांचं स्पष्टीकरण

News Desk