नवी दिल्ली | उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. क़ॉंग्रेसचे नेते जितिन प्रसाद यांनी आज (९ जून) केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांच्या उपस्थितीत भाजप पक्षात प्रवेश केला आहे. केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांच्या उपस्थित त्यांनी हा पक्षप्रवेश केला आहे. दरम्यान, यावेळी जितीन प्रसाद यांनी कॉंग्रेस का सोडली याचं कारण दिलं आहे.
“माझे घराणे तीन पिढ्यांपासून काँग्रेसशी जोडलेले होते. यामुळे काँग्रेस सोडताना मी बराच काळ विचार केला. गेल्या 8-10 वर्षांपासून मला एकच पक्ष खरा राष्ट्रीय वाटत होता, तो म्हणजे भाजप. बाकी सारे पक्ष हे स्थानिक झाले आहेत”, असे जितिन प्रसाद यांनी भाजपात पक्षप्रवेश केल्यानंतर म्हटले आहे. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी ज्योतिरादित्य यांनीही कॉंग्रेसला रामराम करत भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला होता.
देशाच्या भविष्यासाठी, कठीण प्रसंगांत जर कोणता पक्ष आणि नेता उभा असेल तर ती भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. जर मी माझ्या लोकांच्या हिताचे रक्षण करू शकत नाही, तर अशा पक्षात राहण्यात काय अर्थ आहे, असे मला काँग्रेसमध्ये वाटत होते. मी तिथे काहीच करू शकत नव्हतो. मला ज्या काँग्रेस नेत्यांनी आशिर्वाद दिला त्यांचा मी आभारी आहे, आता मी भाजपाचा कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे, असे प्रसाद म्हणाले.
उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तयारीने वेग घेतला आहे. काँग्रेस सुस्त पडलेली असताना भाजपाने मुख्यमंत्र्यांपासून आमदारांच्या कामाचा आढावा आणि मतदारसंघातील वातावरणाचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. याचबरोबर आज भाजपने काँग्रेसला जोरदार झटका दिला आहे.
I have a three-generation connection with Congress, so I took this important decision after a lot of deliberation. In the last 8-10 years I have felt that if there is one party that is truly national, it is BJP. Other parties are regional but this is national party: Jitin Prasada pic.twitter.com/j3yc31QakL
— ANI (@ANI) June 9, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.