HW News Marathi
महाराष्ट्र

९वी आणि ११ वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी!

मुंबई | राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने, ९ वी आणि ११ वीच्या परीक्षा न घेता, विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश द्यावा, अशी मागणी केली जात होती. अखेर ही मागणी मान्य झाली असून ९वी आणि ११ वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविनाच पास केले जाणार आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सरकारने हा निर्ण घेतल्याचे सांगितले जात आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आज या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार होत्या. या चर्चेनंतरच हा निर्णय घेण्यात आला आहे.

वर्षा गायकवाड यांनी काल (६ एप्रिल) विभागाच्या व राज्य मंडळाच्या अधिकाऱ्यांबरोबर व्हिडिओद्वारे संवाद साधला आणि परीक्षांचे नियोजन कसे करता येईल, याची चाचपणी केली. इयत्ता नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात परीक्षेविना प्रवेश द्यावा, याबाबत आजच्या बैठकीत वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही कल होता अशी माहिती मिळत होती. दरम्यान, १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांची ऑफलाईनच परीक्षा होणार आहे. मात्र, ९वी आणि ११ वीच्या विद्यार्थ्यांची मात्र या परीक्षेतून सुटका झाली आहे. इयत्ता १ली ते ८वीच्या परीक्षा रद्द करण्यात आलेल्या आहेत. त्यांना विनापरीक्षा पुढच्या इयत्तेत प्रवेश देण्यात येणार आहे. तसाच निर्णय इयत्ता ९वी आणि ११वी बाबतही घेतला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पक्षवाढीसाठी अविरत प्रयत्न करून पक्षश्रेष्ठींचा विश्वास सार्थ ठरवेन !

News Desk

सोलापूरच्या पालकमंत्री पदी जितेंद्र आव्हाड यांची तात्काळ नियुक्ती

swarit

मुख्यमंत्र्यांनी केले वर्ल्ड इकोनॉमिक फोरम च्या निर्णयाचे स्वागत

News Desk