HW News Marathi
Covid-19

“माझा मोबाईल माझी जबाबदारी” मनसेने महापौरांना पुन्हा डिवचले

मुंबई । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना टोला लगावला आहे. किशोरी पेडणेकर यांनी एका आक्षेपार्ह ट्वीटवर स्पष्टीकरण दिले आहे. “माझ्या मोबाईलवरुन कार्यकर्त्याने ट्वीट केले. तो एका शिवसैनिकाचा राग होता. मात्र ती चूकच आहे. मी समज दिली आहे”, असे स्पष्टीकरण आता महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले आहे. एका ट्विटर युजरच्या प्रश्नाला उत्तर देताना महापौरांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन “तुझ्या बापाला” असे म्हणत आक्षेपार्ह शब्द वापरले आहेत. याचवरून मनसेने महापौरांना डिवचले आहे.

महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिलेल्या स्पष्टीकरणवर संदीप देशपांडे यांनी ट्विट करत महापौरांचे नाव न घेता म्हटले की, “आलं अंगावर ढकल कार्यकर्त्यांवर यापुढे माझा मोबाईल माझी जबाबदारी.” किशोरी पेडणेकर यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले होते की, “ट्विटरवर जे काही लिहिले ते मी लिहिले नव्हते. माझ्या कार्यकर्त्याच्या हातात मोबाईल होता. वांद्रे BKC मध्ये कार्यक्रम सुरु होता, तेव्हा मी त्याच्या हातात मोबाईल दिला होता. त्या कार्यकर्त्याला मी समज दिली आहे. ते ट्वीट मी त्वरित डिलीट केले आहे. शिवसैनिक कार्यकर्त्याने तो राग व्यक्त केला, पण ते चुकीचेच होते.”त्यावर आता मनसेने निशाणा साधला आहे.

काय आहे प्रकरण ?

“मुंबईकराना लस उपलब्ध व्हावी म्हणून ग्लोबल टेंडर काढले गेले आहे. मुंबईकरांच्या १ कोटी लसींसाठी ९ कंपन्या समोर आहेत”, किशोरी पेडणेकर यांनी ‘टीव्ही9 मराठी’ या वृत्तवाहिनीशी बोलताना दिली होती. या वृत्तावर या एका ट्विटर युजरने “काँट्रॅक्ट कोणाला दिले?” असा प्रश्न विचारला होता. या प्रश्नावर महापौरांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन “तुझ्या बापाला” असे उत्तर देण्यात आले आहे. या उत्तरानंतर सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. ह्यावरच आता महापौरांनी स्पष्टीकरण दिले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काटेकोरपणे सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले तर धार्मिक स्थळे सुरु करण्यास कोणी विरोध करणार नाही – राजेश टोपे

swarit

कल्याण-डोंबिवलीमध्ये ही लॉक डाऊन १९ जुलैपर्यंत वाढवला!

News Desk

मराठा समाजाचा एल्गार ! ५ जूनला बीडमध्ये पहिला मोर्चा निघणारच

News Desk