HW News Marathi
महाराष्ट्र

पंढरपूर पोटनिवडणूकीत ‘या’ उमेदवारांची माघार!

पंढरपूर | पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूकीसाठी मतदासंघात निवडणुकीसाठी वैध ठरलेल्या उमेदवारी अर्जांपैकी ११ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी दिली आहे. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठीच्या मतदानाची तारीख जवळ येऊ लागल्याने निवडणुकीतील रंगत वाढली असताना ११ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. दरम्यान, हे मतदान १७ एप्रिल २०२१ ला रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ७.३० वाजेपर्यंत होणार असून, मतमोजणी रविवार दिनांक २ मे २०२१ ला होणार आहे.

कोणत्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतले?

पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी छाननीत एकूण ३० उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी ३ एप्रिल २०२१ला रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत अवधी देण्यात आला होता. उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्यामध्ये महेंद्र काशिनाथ जाधव (पिपल्स रिपब्लिकन पार्टी), नागेश आण्णासो भोसले (अपक्ष), मोहन नागनाथ हळणवर(अपक्ष), इलियास हाजीयुसूफ शेख (अपक्ष),संजय चरणु पाटील (अपक्ष),अमोल अभिमन्यु माने (अपक्ष), रामचंद्र नागनाथ सलगर (अपक्ष), मनोज गोविंदराव पुजारी (अपक्ष), बापू दादा मेटकरी (अपक्ष), अशोक ज्ञानदेव वाघमोडे(अपक्ष), रज्जाक उर्फ अब्दुलरोफ जाफर मुलाणी (अपक्ष) या 11 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.

कोणते उमेदवार निवडणूक लढवणार?

पंढरपूर विधानसभा मतदार संघासाठी भगिरथ भारत भालके (नॅशनॅलिस्ट कॉग्रेस पार्टी), समाधान महादेव आवताडे (भारतीय जनता पार्टी), शैला धनंजय गोडसे (बहुजन विकास आघाडी), सचिन अरुण शिंदे (स्वाभिमानी पक्ष), संजय नागनाथ माने (महाराष्ट्र विकास आघाडी), राजाराम कोडींबा भोसले (बळीराजा पार्टी), सिध्देश्वर भारत आवारे (बहुजन महापार्टी) बिराप्पा मधुकर मोटे (वंचित बहुजन आघाडी) तसेच अपक्ष म्हणून संतोष महादेव माने, संदीप जनार्दन खरात, नागेश प्रकाश पवार, अभिजीत वामनराव आवाडे-बिचकुले, सुनिल सुरेश गोरे, सिताराम मारुती सोनवले, सिध्देश्वर बबन आवताडे, सुदर्शन रायचंद खंदारे, कपिलदेव शंकर कोळी, सुदर्शन पांडूरंग मसुरे, बिरुदेव सुखदेव पापरे हे 21 उमेदवार निवडणूक लढविणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गुरव यांनी यावेळी दिली.

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठीच्या मतदानाची तारीख जवळ येऊ लागल्याने निवडणुकीतील रंगत वाढली आहे. या मतदारसंघात भाजपआणि राष्ट्रवादी आमने-सामने असून दोन्ही पक्षांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. भाजपने समाधान आवताडे यांना उमेदवारी दिल्यानंतर राष्ट्रवादीने दिवंगत आमदार भारत भालके यांचे सुपुत्र भगिरथ भालके यांना मैदानात उतरवलं. दोन्हीही उमेदवार तगडे असल्याने उत्सुकता निर्माण झालेली असतानाच भाजप उमेदवार समाधान आवताडे यांना मात्र मोठा धक्का बसला आहे. कारण आवताडे यांच्यासमोर आता त्यांच्या घरातूनच आव्हान उभं राहिलं आहे.

समाधान आवताडे यांचे चुलत बंधू सिद्धेश्वर आवताडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने समाधान आवताडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. सिद्धेश्वर आवताडेंनी समजूत काढण्यासाठी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी केलेले प्रयत्न निष्फळ ठरले. सिद्धेश्वर आवताडे यांच्या उमेदवारीमुळे समाधान आवताडेंसमोर मतविभागणीचे मोठं आव्हान उभं राहिलं आहे.

कोण आहेत सिद्धेश्वर आवताडे?

सिद्धेश्वर आवताडे यांचाही मतदारसंघात चांगलाच संपर्क आहे. त्यांच्या ताब्यात मंगळवेढ्यातील जवळपास 50 ग्रामपंचायती, तसंच शेतकऱ्यांना पत पुरवठा करणाऱ्या विविध कार्यकारी सोसायट्यांवर त्यांचं वर्चस्व आहे. सिद्धेश्वर आवताडे निवडणूक लढण्यावर ठाम असल्याने भाजपची मात्र अडचण निर्माण झाली आहे. आज 3 एप्रिल अर्ज माघारी घेण्याची शेवटची तारीख आहे. सिद्धेश्वर आवताडे यांनी आज शेवटच्या दिवशीही अर्ज मागे न घेतल्यास समाधान आवताडेंसाठी ही निवडणूक आणखी खडतर होऊ शकते. रोजी होणार असल्याचेही निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी यावेळी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

इंदू मिलमधील डॉ.बाबासाहेबांचे स्मारक, जगाला प्रेरणा देणारे ठरेल | मुख्यमंत्री

News Desk

खडसेंनी नैतिकतेच्या गोष्टी करु नयेत – प्रवीण दरेकर

News Desk

म्हणून परत एकदा पाहिजे फडणवीस सरकार!- नितेश राणे

News Desk