HW News Marathi
महाराष्ट्र

खासदार इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल, शासकीय कामात अडथळा आणल्याचा आरोप

औरंगाबाद | औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय कामात अडथळा अणल्याप्रकारणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. दुकानांना सील ठोकल्यामुळे खासदार इम्तियाज जलील हे भडकले आणि त्यांनी काल (१ जून) कामगार कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली होती. त्यानंतर आज त्यांच्यावर ही कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. इम्तियाज जलील यांच्यासह २४ दुकानदारांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवाजवी दंड ठोठावल्या प्रकरणी इम्तियाज जलील हे कामगार कार्यालयात गेले होते यावेळी त्यांना व्हिडीओही समोर आला होता.

लॉकडाऊनच्या नियमांचं उल्लंघन केल्याने एका दुकानावर कारवाई करण्यात आली होती. या दुकानाचं सील काढण्यासाठी खासदार इम्तियाज जलील हे व्यापाऱ्यांसोबत कामगार उपायुक्तांच्या कार्यालयात गेले होते. त्यावेळी कामगार उपायुक्त कार्यालयातील जमलेल्या जमावाचं कर्तव्य म्हणून चित्रीकरण करणार्‍या महिला कर्मचाऱ्याचा मोबाईल खाली पाडण्यासाठी इम्तियाज जलील यांनी त्यांच्या हातावर फटका मारला. महिला कर्मचाऱ्याने घडलेल्या घटनेची माहिती वरिष्ठांना दिली आहे.

लॉकडाऊनच्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून औरंगाबादमधील अनेक दुकानं सील करण्यात आली आहेत. शिवाय या दुकानांना दंडही ठोठावण्यात आला आहे. परंतु छोट्या व्यापाऱ्यांना हा दंड भरणं शक्य नाही, त्यामुळे त्यांना आपली दुकानं सुरु करता येत नाहीत. याच कारणामुळे इम्तियाज जालील कामगार कार्यालयात गेले होते. यावेळी त्यांनी कामगार उपायुक्त शैलेंद्र पोळ यांना जाब विचारला होता.

कार्यालयात जमलेल्या गर्दीचं चित्रीकरण महिला पोलीस कर्मचारी करताना इम्तियाज जलील चांगलेच संतापले होते. “मनोरंजनासाठी चित्रपट पाहायला आलेलो नाही, जमत नसेल तर बाहेर उभे राहा,” अशा शब्दात जलील यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना सुनावलं आणि कर्मचाऱ्याच्या हातावर फटका मारला. त्यानंतर इम्तियाज जलील यांच्यासह इतर २४ दुकानदारांच्या विरोधातही गुन्हा दाखल झाला आहे. इम्तियाज जलील आणि २४ व्यापाऱ्यांविरोधात आयपीसीच्या कलम ३५३, ३३२, १८८, २६९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

..तर ‘एटीएस’ने आता नाना पटोले यांचीही चौकशी करावी – सामना

News Desk

वाघाशी दोस्ती करायला आम्ही कधीही तयार, कारण वाघाशी कधी दुश्मनी नव्हतीच!

News Desk

माझ्या कंपन्यांचं जाऊद्या, पण माझ्या तीन बहिणींवर IT च्या धाडी का?

News Desk