HW News Marathi
महाराष्ट्र

संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना कोरोनाची लागण !फोर्टीस रुग्णालयात दाखल

मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना फोर्टीस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वर्षा राऊत यांना सर्दी, खोकला झाला होता. त्यानंतर कोरोना टेस्ट केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, संजय राऊत यांनाही आता त्यांची कोरोना चाचणी करावी लागणार आहे.

एकीककडे राज्यात कोरोना रुग्ण संख्या वाढत असताना सामान्यांपाठोपाठ आता नेत्यांनाही आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही कोरोनाची लागण होत आहे. नुकतंच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. तसेच, त्यांचे पुत्र आणि मंत्री आदित्य ठाकरे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

काय आहे प्रकरण?

पीएमसी बँकेतील घोटाळ्याच्या चौकशीसाठी वर्षा राऊत यांना २९ डिसेंबरला ईडीसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर वर्षा राऊत यांनी ५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ मागितली होती. वर्षा राऊत यांना PMC बँकेतील खात्याशी संबंधित कागदपत्रं घेऊन कार्यालयात येण्यास सांगितलं आहे. संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधवी राऊत आणि वर्षा राऊत यांच्यात झालेले आर्थिक व्यवहार ईडीच्या रडारवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे प्रवीण राऊत यांना काही दिवसांपूर्वी ईडीने अटक केली होती. मात्र त्यांची जामिनावर सुटका झाली होती.

पीएमसी बँक खोटे खाते दाखवत एका रियल इस्टेट डेव्हलपरला जवळपास 6500 कोटी रुपये कर्ज देत असल्याची माहिती रिझर्व्ह बँकेला 2019 मध्ये मिळाली होती. हा व्यवहार होऊ नये आणि पैसे वाचावे या हेतूने रिझर्व्ह बँकेने पीएमसी बँकेवर २४ सप्टेंबर २०१९ला निर्बंध लादले. हे निर्बंध ३१ मार्च २०२१ पर्यंत वाढवण्यात आले आहेत. या प्रकरणी ईडीचा तपास सुरु आहे.

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने पीएमसी बँकेचं कर्ज बुडवणाऱ्या सारंग वाधवान आणि राकेश वाधवान यांना अटक केली होती. हे दोघे एचडीआयएल कंपनीचे संचालक आहेत. पीएमसी बँकेचं कर्ज बुडवणाऱ्या एकूण 44 मोठ्या खात्यांपैकी 10 खाती ही एचडीआयएल (HDIL) आणि वाधवान यांच्याशी संबंधित आहेत. त्यामुळे ही कारवाई महत्त्वाची मानली जाते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आमदार रवींद्र वायकर यांची समन्वयक म्हणून नियुक्ती मात्र शिवसेनेतील २ नेत्यांची याबाबत नाराजी

News Desk

…अन्यथा आमचा लढा पुन्हा सुरु करु, संभाजीराजेंचा मुख्यमंत्र्यांना पत्रातून इशारा

News Desk

Maharashtra Budget 2021-22 : सहकार व पणन विभागासाठी १२८४ कोटी रुपये देणार

News Desk